पुण्यात ‘ इन्स्टंट ‘ चा पर्दाफाश..टुरिस्ट गाडीतच तरुणी असायच्या फोन आला की लगेच

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना पुणे शहरात समोर आली आहे. दोन जण चक्क टुरिस्ट गाडीतून काही तरुणींना घेऊन फिरत आणि मागणी आली कि लगेच त्यांना वेश्याव्यवसायास जुंपत असा धक्कादायक प्रकार सामाजिक सुरक्षा विभागाने उघडकीस आणला आहे.मानवी तस्करी करणाऱ्यांनी परराज्यातून महिलांना आणून टुरिस्ट गाडीतून आणून हा प्रकार सुरु असल्याची पोलिसांना कल्पना देण्यात आली आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

उपलब्ध माहितीनुसार , कुलदीप प्रसाद मोहनप्रसाद महतो (वय २६, रा. ठाणे, मूळ गाव झारखंड) आणि जयशंकर प्रसाद रमेश साव (वय २०, रा. मुंबई, मूळ गाव झारखंड) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. विमाननगर, येरवडा भागात दोघे जण टुरिस्ट गाडीतून फिरत असून याच गाडीत ते तरुणी घेऊन फिरतात आणि कोणी मागणी केली की लगेच गाडीतून त्यांना उतरवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतात अशी माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती आणि त्याच्या आधारे पोलिसांनी सापळा लावला.

पोलिसांच्या हाती त्यांचे नंबर येताच एका बनावट ग्राहकाने त्यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी विमाननगरमधील ईस्ट फिल्ड हॉटेलमध्ये दोन रूम बुक करायला सांगितल्या आणि या ग्राहकाने रूम बुक केल्या आणि त्यानंतर या रूममध्ये दोन महिलांना घेऊन जात असतानाच पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले.

सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, उपनिरीक्षक श्रीधर खडके, हवालदार राजेंद्र कुमावत, राजश्री मोहिते, मनीषा पुकाळे, आण्णा माने, प्रमोद मोहिते, हणमंत कांबळे, इरफान पठाण, पुष्पेंद्र चव्हाण यांनी हॉटेलजवळ सापळा रचून ही कामगिरी केली आहे.


शेअर करा