पिंकीने ‘ हे ‘ केले नसते तर , एका चिठ्ठीत मेहुणीचे कारनामे लिहून …

शेअर करा

संसार म्हटलं की एकमेकांवर विश्वास हवाच मात्र तरी देखील किरकोळ कारणावरून अनेकदा संसारात भांडण तयार होतात आणि त्यातून दुहेरी हत्याकांडात सारखा देखील धक्कादायक प्रकार घडतो अशीच एक घटना उत्तराखंड इथे उघडकीला आली असून संतप्त जावयाने स्वतःची पत्नी आणि सासूचा खून केला मात्र खून केल्यानंतर काही कालावधीत त्याला पश्चाताप होऊ लागला आणि त्यातून त्याने रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. सदर घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस प्रकरणाचा शोध घेत आहेत.

उपलब्ध माहितीनुसार , निखिल उर्फ सोनुनाथ असे आरोपीचे नाव असून उत्तराखंडमधील उधमसिंगनगर येथील जसपूर येथे मंगळवारी ही घटना घडलेली आहे. मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास रेल्वेसमोर सोनुनाथ याने उडी मारून आत्महत्या केली. पोलीस त्याचा शोध घेत होते. त्याच्याजवळ सापडलेल्या सुसाईड नोटवरून त्याची ओळख पटली असून त्याने त्याची पत्नी आणि सासूचा खून केला आणि नंतर आत्महत्या केली.

सुसाईड नोटमध्ये म्हटल्याप्रमाणे कुटुंबात निखिलचे पटत नव्हते. सोनूचे दुसरे लग्न 8 वर्षांपूर्वी निशूसोबत झाले होते आणि सोनूला २ मुलगे आणि एक मुलगी आहे. सुसाईड नोटमध्ये निखिलने या संपूर्ण घटनेसाठी मेहुणी पिंकीला जबाबदार धरले असून पिंकीच त्याच्याबद्दल पत्नी आणि सासूला चुकीच्या गोष्टी सांगायची. असे म्हटलेले आहे. पिंकीने हे केले नसते तर हे सर्व घडले नसते असे म्हणत ‘ नीतू तू माझी पत्नी होतीस आणि मी तुझ्यावर माझ्या जीवापेक्षा जास्त प्रेम केले आणि मी तुला मारले. मी माफीला पात्र नाही. पण मी तुझ्याकडे येत आहे. शक्य असल्यास मला माफ करा ‘ असे लिहलेले आहे .

एक आठवडाभरापूर्वी नीशू आणि निखिल उर्फ पती सोनूमध्ये भांडण झाले होते. रागाच्या भरात त्याने निशू आणि आई जयंतीची हत्या केली. दुहेरी हत्याकांडानंतर 27 फेब्रुवारी रोजी सोनूने आपल्या मुलांना अमरोहा येथे बहिणीकडे सोडले आणि तो फरार झाला. निखिल हा मार्केटिंग कंपनीत सेल्स एक्झिक्युटिव्ह होता.निखिल हा जसपूरचा रहिवासी असल्याने त्याला ट्रेनने कापल्याची माहिती मिळताच लोकांनी पोलिसांना माहिती दिली. उधम सिंह नगर एसओजीचे प्रभारी कमलेश भट्ट पुढील तपास करत आहेत.


शेअर करा