महाराष्ट्र हादरला..प्रेयसीसोबत असताना आईवडिलांना मेसेज ‘ मला माफ करा ‘ अन..

शेअर करा

महाराष्ट्रात धक्कादायक घटना समोर आलेली असून निव्वळ संशयातून एका प्रियकराने अत्यंत थंड डोक्याने प्रेयसीचा दगडाने ठेचून खून केला आहे . यवतमाळ जिल्ह्यात ही घटना समोर आली असून त्याने यानंतर स्वतःचा देखील गळा चिरून घेतला. खून करण्यापूर्वी त्याने मोठ्या प्रमाणात दारूचे सेवन केले होते त्यानंतर त्याने आई-वडिलांसह बहिणीला ‘ मला माफ करा ‘ असा मेसेज पाठवला आणि त्यानंतर प्रेयसीची हत्या केली. प्रेयसीचा मृत्यू झाला असला तरी त्याला मात्र वाचवण्यात यश आलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, आस्था सुरेश तुंबडे ( वय 18 ) असे मयत तरुणीचे नाव असून शुभम अशोक बकाल ( वय 23) असे मारेकरी युवकाचे नाव आहे. गेल्या काही वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते आणि शुभम हा आस्था हिच्यावर जीवापाड प्रेम करत होता. शुभम हा एका सूतगिरणीत मजूर म्हणून कामाला होता आणि कमवत असलेल्या पैशातून बराचसा पैसा शुभम हा आस्था हिच्यासाठी खर्च करायचा आणि उरलेली रक्कम घरी द्यायचा.

आस्था तुंबडे (१८) ही होतकरू असल्याने गुरुमाऊली सोसायटी उमरसरातील आपल्या घरीच लहान मुलांच्या शिकवणीसुद्धा घेत होती. बुधवारी आस्था कुटुंबीयांसह राळेगाव येथे गेली होती आणि परत आल्यानंतर तिने गुरुवारी शिष्यवृत्तीचा अर्ज भरण्यासाठी लागणारे कागदपत्र बॅगेत घेतले. आईला तिचा मोबाइल मागितला व स्वत:च्या स्कुटीने घराबाहेर पडली. मुलगी अर्ज भरायला गेली असाच कुटुंबीयांचा समज होता मात्र दुपारी १.३० वाजताच्या सुमारास आस्थाच्या आईला तिच्या खुनाची माहिती देण्यात आली. शुभमने स्वत:च्या प्रेयसीला सोबत आणून एकांतात तिचा घात केला, याची कबुली त्याने रस्त्यावर तडफडत असताना पोलिसांकडे दिली असल्याची माहिती आहे .

पोस्ट ऑफिसमध्ये आलेल्या आस्था हिला आरोपीने सोबत घेतले आणि दोघेही एका ठिकाणी निर्जनस्थळी पोहोचले त्यानंतर शुभमने तिची हत्या करून स्वतःचा गळा चिरून घेतला. त्याच्यावर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असून दुर्दैवाने त्याची प्रेयसी असलेली आस्था हिचा मृत्यू झालेला आहे. आस्था हिचे वडील सुरेश तुमबडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून लोहारा पोलिसांनी आरोपी शुभम याच्याविरोधात कलम 302 309 या नुसार गुन्हा दाखल केला असून शुभमची प्रकृती सुधारल्यानंतर त्याला अटक केली जाईल असे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आलेले आहे.


शेअर करा