नागराज मंजुळे यांच्या ‘ झुंड ‘ कडे प्रेक्षकांची पाठ, आतापर्यंत कमाई किती ?

शेअर करा

नागराज मंजुळे यांच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षेत असलेल्या झुंड या सिनेमाला समीक्षकांनी वाहवा केलेले असले तरीदेखील तिकीटबारीवर मात्र सदर चित्रपट अपयशी दिसून येत असल्याचे चित्र आहे. समीक्षकांनी त्यांच्या अंदाजानुसार चित्रपटाला उत्तम म्हणून म्हटले असले तरी व्यवसायिक धोरणानुसार तरी म्हणावे असे यश अद्यापपर्यंत चित्रपटाला मिळालेले नाही.

चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी केवळ एक ते दीड कोटी रुपयांची कमाई या चित्रपटाने केली असून बॉक्स ऑफिसवरील कमाईचा आकडा निर्माता आणि दिग्दर्शकांचा हिरमोड करणारा आहे. अमिताभ बच्चन यांच्यासारखा मोठा स्टार आणि कथानक देखील दमदार असताना व्यावसायिक पातळीवर मात्र आवश्यक असलेला मालमसाला या चित्रपटात नसल्याने प्रेक्षकांनी चित्रपटाकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.

फॅन्ड्री आणि सैराट यांच्या तुलनेत हिंदीमध्ये मोठे विक्रमी यश मिळेल अशी अपेक्षा असताना बॉक्स ऑफिस वरील थंड प्रतिसादाने निव्वळ उत्तम कथानक असून देखील चित्रपटात प्रेक्षकांसाठी हवा असा मालमसाला नसेल तर व्यावसायिक पातळीवर चित्रपट यशस्वी ठरत नाही याची प्रचिती आल्याचे दिसून येत आहे. एकट्या सैराट चित्रपटाने महाराष्ट्रातच शंभर कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता त्यानंतर नागराज मंजुळे यांच्या या चित्रपटाकडून मोठ्या प्रमाणात यशाची अपेक्षा होती मात्र पूर्वीच्या तुलनेत आत्तापर्यंत तरी अपेक्षित असा प्रतिसाद चित्रपटाला मिळालेला दिसून येत नाही.


शेअर करा