पंतप्रधान मोदी हे पुणे येथे अर्धवट झालेल्या मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी आलेले असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या भाषणाची सध्या सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा आहे. अजित पवार यांनी स्टेजवर ‘ राजकारणात मोठ्या महत्त्वाच्या पदावर बसणाऱ्या व्यक्तींकडून चुकीची वक्तव्ये होत आहेत. देशाच्या वाटचालीत या महापुरुषांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या या कार्याचा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे याकडे मी लक्ष वेधतो. कोणाबद्दल आकस असूया न ठेवता महापुरुषांविषयी अनावश्यक चुकीचे वक्तव्य करू नये ‘ असे सुनावले होते. अजित पवार यांच्या बोलण्याचा रोख हा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे होता.अजित पवार यांच्या या भाषणाची सध्या सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू आहे तर मोदी यांचा चेहरा यावेळी पाहण्यासारखा झालेला होता.
राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. सोशल मीडियामधून अनेक जणांनी त्याबद्दल संतप्त प्रतिक्रिया दिल्या. राज्यपाल पदावर विराजमान असलेल्या अशा व्यक्तीकडून अशा प्रकारचे विधान संतापजनक होते. अजित पवार यांनी कोशारी यांचे नाव न घेता, ‘ ज्यांना आपला आदर्श मानता, देशात रयतेचे राज्य शेतकऱ्याचे स्वराज्य निर्माण केले त्यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य होऊ नयेत, ‘ अशी अपेक्षा व्यक्त केली.
अजित पवार पुढे म्हणाले की, ‘ पुणेकर यांच्या सहनशक्तीला दाद दिली पाहिजे. अनेक वर्षांच्या मोठ्या प्रकल्पाची पुणेकरांची अपेक्षा होती. आज बारा वर्षानंतर प्रत्यक्षात पुण्याची मेट्रो अवतरत आहे. स्वारगेट ते कात्रज, पिंपरी चिंचवड ते निगडी, वनाज ते रामवाडी, रामवाडी ते वाघोली, खराडी ते हडपसर आणि हडपसर ते स्वारगेट अशा मेट्रो प्रकल्पाचा अहवाल करायचे काम सुरू आहे आणि या कामांमध्ये राजकारण न आणता मदत करावी, ‘ अशी देखील मागणी अजित पवार यांनी केली.