त्याच्या ‘ भिशी ‘ च्या आयडियाने विवाहिता भुलली , सगळ्या मर्यादा ओलांडल्या अन..

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना बुलढाणा येथे उघडकीला आली असून शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने महिलेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार तर केलाच शिवाय तिची आर्थिक फसवणूक देखील केली. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले आणि तिने पोलिस ठाण्यात धाव घेऊन आरोपीच्या विरोधात पोलिसात तक्रार नोंदवली आहे.

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी आसिफ खान तय्यब खान हा पीडित महिलेच्या घरासमोर सातत्याने बसत असायचा त्यानंतर त्यांची ओळख झाली आणि त्यांनी एकमेकांशी फोनवर बोलायला सुरु केले. सुमारे एक वर्षापूर्वी महिलेचा पती घरी नसताना आरोपी तिच्या घरात घुसला आणि आणि तिच्यावर पाशवी अत्याचार केला तसेच जर कोणाला काही सांगितले तर तुला जीवे मारील अशी देखील त्याने तिला धमकी दिली. महिला शांत राहते आहे हे त्याच्या लक्षात आल्यानंतर 15 ऑक्टोबर 2021 रोजी पुन्हा तो महिलेच्या घरी आला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला सोबतच पैशाची गरज असल्याचे देखील त्याने महिलेला सांगितले.

महिला देखील आर्थिक अडचणीत होती मात्र त्याने तिला धमकी दिल्यामुळे तिने अखेर वेगवेगळ्या गटातून काढून त्याला 80 हजार रुपये दिले. त्याने माझी भिशी लागली की तुला पैसे परत देतो असे देखील सांगितले त्यामुळे महिलेचा त्याच्यावर विश्वास बसला. काही काळाने महिलेने पैसे मागायला सुरू केले त्यावेळी त्याने तिचे फोन उचलणे बंद केले त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे तिच्या निदर्शनास आले.

महिलेने काळजावर दगड ठेवून सदर घटना आपल्या पतीला पूर्णपणे कथन केली. पती यांनी तिची बाजू समजून घेत शहर पोलिसात आरोपीच्या विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश लोधी हे करत असून अद्यापपर्यंत तरी आरोपीला अटक करण्यात आली नव्हती. सदर घटना उघडकीला आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


शेअर करा