अन ‘ त्या ‘ वेळी महिलेला फसवले गेल्याची जाणीव झाली , आता प्रकरण पोलिसात

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असून अशीच एक घटना नागपूर इथे समोर आलेली असून एका युवकाने एका महिलेला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यास भाग पाडून चक्क दोन वर्षे तिची फसवणूक केली. पतीनं सोडल्यानं या महिलेनं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणं पसंत केलं होतं मात्र लिव्ह इन रिलेशनशिप ज्या युवकासोबत केलं त्या युवकाने देखील महिलेची फसवणूक केली म्हणून तिने आता पोलिसात धाव घेतली आहे .

उपलब्ध माहितीनुसार, नागपुरात एका महिलेनं पती सोडून गेल्यानं एका युवकासोबत लिव्ह इन रिलेशनशिपचा पर्याय निवडला होता. संबंधित महिला तब्बल 2 वर्ष या युवकासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिली मात्र काही दिवसांपूर्वी युवकाचा अन्य तरुणीसोबत साक्षगंधाचा कार्यक्रम झाला. हे पीडितेला समजताच तिने त्या युवकाला जाब विचारायला सुरु केले त्यानंतर आरोपी युवकाने पीडितेला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली .

स्वप्निल किसन बर्वे असं या युवकाचं नाव आहे. पीडित महिला आपल्या दोन मुलांसह पतीपासून वेगळी राहत होती. महिलेच्या याच गोष्टीचा फायदा घेत स्वप्निलने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि त्यानंतर लग्नाचं अमिष दाखवून तिच्यावर 2 वर्ष अत्याचार केले. एके दिवशी अचानक त्याने अन्य मुलीसोबत साक्षगंधाचा कार्यक्रम केला हे पीडितेच्या लक्षात येताच तिला फसवणूक झाल्याची जाणीव झाली आणि तिने पोलिसात धाव घेतली .

पोलिसात तक्रार दखल होताच पोलिसांनी तातडीने सूत्रे फिरवत आरोपीस गजाआड केले असून त्याला न्यायालयात हजर केले असता 11 मार्चपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे .नागपुरच्या पारशिवनी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.


शेअर करा