नाती शर्मसार..सुनेच्या अंथरुणात चक्क सासरा ‘आक्षेपार्ह ‘ अवस्थेत आढळून आला अन ..

शेअर करा

देशात एक वेगळीच घटना समोर आलेली असून सुनेशी अनैतिक संबंध असल्याने पित्याने चक्क आपल्या मुलाची हत्या केल्याचे प्रकरण समोर आलेले आहे . राजस्थान येथील अलवरच्या बहरोड़ येथील ही घटना असून व्यावसायिक असलेले विक्रमसिंह यांचा यात खून झालेला आहे. व्यापारी असलेले वडील रात्री आपल्या सुनेला भेटायला आले असताना मुलाने आपल्या वडिलांना पत्नीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले म्हणून सून आणि सासऱ्याने त्यांचा खून केला आहे. खून गेल्यावर गुपचूप अंत्यसंस्कार करण्याचा त्यांचा प्लॅन होता मात्र एका निनावी फोनने त्यांचा पर्दाफाश झाला.

अलवर जिल्ह्यातील बहरोड़ येथे विक्रमसिंह नावाच्या एका व्यावसायिकाचा मृत्यू झाला होता. सून आणि सासरे यांना मुलाने संशयास्पद अवस्थेत पाहिले असल्याचे पोलिसांचे म्हणणे असून दोघांनी मिळून त्याची हत्या केली असे सांगण्यात आले आहे . सासूचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता आणि त्यानंतर सासऱ्याने सुनेसोबत अनैतिक संबंध सुरु केले होते. पोलिसांनी मृताच्या पत्नीच्या सासऱ्यांला आणि पत्नीला बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत विक्रम सिंहचे वडील आणि त्यांच्या पत्नीचे अवैध संबंध होते. 5 मार्च रोजी विक्रम सिंह पत्नी आणि मुलांसोबत जेवण करून झोपले असताना सासरा घरी आला आणि मृताने वडील व पत्नीला संशयास्पद अवस्थेत पाहिल्यानंतर दोघांनी मिळून त्याचा खून केला. सकाळी पत्नीने पती विक्रम सिंह याला बेडवरून खाली पाडले आणि आरडाओरडा सुरू केला. मृताचे वडील बलवंत सिंग आणि इतर कुटुंबीयांनी विक्रम सिंगला बेडवरून उचलून रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले मात्र त्याआधीच एका फोनने संपूर्ण रहस्य उघड केले.

मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले तेव्हा डोक्याला मार लागल्याच्या खुणा आढळल्या. मृताच्या पत्नी पूजाची कडक चौकशी केली असता तिने या गुन्ह्याची कबुली दिली आहे. बलवंत याच्या पत्नीचे २०२० मध्ये निधन झाले यानंतर त्याचे आपल्या सुनेशी अनैतिक संबंध सुरु झाले. अपघाताच्या रात्री मयत विक्रमने वडील बळवंत व पत्नी यांना संशयास्पद अवस्थेत पाहिले म्हणून त्यांचा खून करण्यात आला. सध्या पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून या प्रकरणात इतर कुणाचा सहभाग आहे का याचा तपास सुरु आहे.


शेअर करा