काळ्या कावळ्याची ‘ अशीही ‘ कमाल आणि उडवली सोशल मीडियावर धमाल : पहा व्हिडीओ

शेअर करा

पशु-पक्षांना बोलता येत नसलं तरी समजूतदारपणामध्ये ते माणसापेक्षा कुठेही कमी नसतात अशी अनेक उदाहरणे देणाऱ्या घटना याआधी घडल्या आहेत .त्यांच्यापासून मनुष्याला अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. सध्या इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तर जगभरात कुठेही घडलेली अशी मनाला भावणारी एखादी घटना क्षणात व्हायरल होते आणि पक्षी प्राण्यांमधील दयाळूपणाचे अनेक व्हायरल व्हिडिओ पहायला मिळतात. असाच एक नवीन व्हिडीओ व्हायरल झाला आहे, यात कावळा हायवे क्रॉस करणाऱ्या दुसऱ्या एका प्राण्याला चोचीने पुढे ढकलत नेत आहे जेणेकरून त्याचा जीव वाचला जाईल.

https://twitter.com/SJPeace/status/1264537597956800512

या व्हायरल व्हिडीओमध्ये वाहनांची ये-जा सुरु असलेल्या एका मुख्य रस्त्यावर एक हेजहोग म्हणजे उंदरासारखा प्राणी नावाचा प्राणी रस्त्यातच थांबल्याचे दिसत आहे. मात्र, त्याची ही अवस्था पाहून एक कावळा रस्त्यावर येतो आणि त्याला रस्ता ओलांडण्यासाठी चोचीने घाई करून पुढे ढकलत आहे जेणेकरून त्याचा जीव वाचला जाईल. StanceGrounded (@SJPeace) या ट्विटर युजरने हा व्हिडीओ शेअर केला असून त्याला कॅप्शनही दिली आहे. “रस्त्यात अडकलेल्या हेजहोगचा मृत्यू होऊ नये म्हणून एक कावळा त्याला रस्ता ओलांडण्यासाठी मदत करीत आहे. सगळे हिरो हे कॅपच घालतात असं नाही,” असं त्यानं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

गाडी चालवताना अचानक पुढे हा प्राणी आल्याने गाडीचालकाने गाडी थांबवली आणि ह्या पूर्ण घटनेचा व्हिडीओ चित्रित केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ट्विटरच्या माध्यमातून हा व्हायरल व्हिडीओ प्रचंड प्रमाणात व्हाययरल झाला आहे. तो २.१ मिलियन लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ नेटिझन्सला इतका आवडला आहे की त्यांनी कमेंटमध्ये या कावळ्यासाठी अक्षरशः प्रार्थना केल्या आहेत.

संबंधित बातम्या

लॉकडाऊनदरम्यान सर्रास सुरु होते मसाज पार्लर,पोलिसी कारवाईत आठजण रंगेहाथ धरले : कुठली बातमी ?
https://nagarchaufer.com/?p=56

मोलकरणीशी अनैतिक संबंधाकरिता आईवडील बहीण आणि बायकोलाही संपवले : कुठे घडला प्रकार ?
https://nagarchaufer.com/?p=51

महिला मित्रासोबत रंगेहाथ धरले जाऊ नये म्हणून बाल्कनीतून मारली उडी : भाजपच्या नेत्याचा प्रताप
https://nagarchaufer.com/?p=89

लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या विवाहितेची ‘ ह्या ‘ कारणावरून प्रियकराने केली गळा आवळून हत्या : महाराष्ट्रातील बातमी
https://nagarchaufer.com/?p=128

फक्त इनर वेअर घालून कोरोनाच्या उपचारात गुंतलेल्या एका नर्सचा फोटो तुम्हाला आलाय काय ? : सत्यपरिस्थिती काय ?
https://nagarchaufer.com/?p=131

लॉकडाऊनमुळे भावी पतीचा विरह सहन होत नसल्याने नवरीने पायी गाठले भावी पतीचे घर : पुढे काय झाले ?
https://nagarchaufer.com/?p=80


शेअर करा