नगर ब्रेकिंग..महिला पोलीसाच्या पोटात मारली होती लाथ अखेर कोर्टाचा ‘ निर्णय आला ‘

शेअर करा

न्यायालयात कर्तव्यावर काम करत असताना महिला पोलीस नाईक प्रमिला गायकवाड यांना मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण करणारा आरोपी प्रमोद उर्फ भावड्या दादू पगारे ( राहणार सिव्हिल हडको नगर ) याला जिल्हा न्यायाधीश बी एस गोरे यांनी दोषी ठरवून एक वर्ष साधी कैद आणि तीन हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास पंधरा दिवस साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे. सरकारी पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील मोहन कुलकर्णी यांनी काम पाहिले

पोलीस नाईक प्रमिला गायकवाड ह्या 30 जून 2015 रोजी नगर येथे न्यायालयीन कर्तव्यावर काम करत असताना दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास गर्दी जमली म्हणून महिला पोलीस सहाय्यक फौजदार कल्पना केदारे तिथे गेल्या होत्या. त्या गर्दी हटवत असताना गायकवाड देखील तिथे आल्या आणि त्याच वेळी सब जेल मधून आलेल्या तीन आरोपीपैकी एकाने गायकवाड यांना मारहाण केली आणि त्यांच्या पोटात लाथ मारली म्हणून आरोपीच्या विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर तपासाला सुरुवात झाली. सहाय्यक फौजदार बी. धनगर यांनी आरोपींच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारच्या वतीने सर्व साक्षीपुरावे तपासल्यानंतर न्यायालयाने अखेर निर्णय दिला आहे .


शेअर करा