नगर ब्रेकिंग..सोनसाखळी चोरांकडचा ‘ माल ‘ पाहून तुम्हीही म्हणाल की ..

शेअर करा

राज्यात गाडीवर येऊन धूम स्टाईलने मंगळसूत्र आणि दागिने चोरणाऱ्याची काही कमी नाही मात्र आता संगमनेर तालुका पोलिसांच्या पथकाने दोन साखळी चोरांना जेरबंद केले असून त्यांच्याकडून तब्बल सात लाखांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील रहिवासी किशोरी अमित लोंढे या 9 मार्च रोजी घरी जात असताना संगमनेर- लोणी रस्त्यावर दोन जणांनी त्यांना धक्का मारून पाडले आणि मंगळसूत्र ओरबाडून लोणीच्या दिशेने पळून गेले त्यानंतर लोंढे यांनी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता . पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने शोध घेऊन सोनू उर्फ भैरव विश्वनाथ पवार ( वय बावीस ) व अविनाश उर्फ आवड्या देविदास केंदळे ( वय 27 दोघेही राहणार नायगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक ) यांना बेड्या ठोकल्या होत्या.

आरोपींनी अशाच पद्धतीने संगमनेर शहर, पिंपळगाव बसवंत, मानोरी गाव, विंचूर येथे सोनसाखळी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून तब्बल साडे सोळा तोळे वजनाचे सुमारे सहा लाख साठ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि चाळीस हजार रुपये किमतीची गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल आदी मुद्देमाल जप्त केला आहे. सदर प्रकार घडल्यानंतर तात्काळ कारवाई करत आरोपींना जेरबंद केल्यामुळे संगमनेर पोलिसांचे परिसरात कौतुक केले जात आहे.


शेअर करा