पुणे हादरले..एवढं करूनही त्याचे समाधान नाहीच म्हणाला ‘ आता तुझा नवरा.. ‘

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक वेगवेगळे प्रकार उघडकीला येत असताना अंधश्रद्धेच्या माध्यमातून देखील फसवणूक करणाऱ्यांची कमी नाही. अनेकदा केवळ आर्थिक फसवणूक नव्हे तर चक्क महिलांचे शारीरिक शोषण देखील मोठ्या प्रमाणावर यात केले जात आहे. अशीच एक घटना पुणे येथे उघडकीला आली असून तुमच्या घरावर कोणीतरी काळी जादू केली आहे म्हणून अघोरी पूजा करण्यासाठी म्हणून एका महिलेकडून तब्बल वीस लाख रुपये वेळोवेळी लुटले आणि गुंगीचा पदार्थ खायला घालून महिलेवर बलात्कार केला. याप्रकरणी एका भोंदू बाबाला अटक करण्यात आली असून विनोद शंकर पवार ( वय ३३ राहणार ज्योतिबा नगर काळेवाडी ) असे अटक केलेल्या भोंदू बाबाचे नाव आहे.

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, विनोद शंकर पवार ( वय 30 ) याने किवळे, मारुंजी आणि औरंगाबाद जिल्ह्यात ऑक्टोबर दोन हजार वीसपासून हा प्रकार सुरू केला होता तर19 जानेवारी 2021 आपले वेळोवेळी शोषण करत होता असे म्हटलेले आहे. देहूरोड पोलिस ठाण्यात 38 वर्षीय महिलेने त्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे .

महिलेच्या घरात वारंवार कटकटी सुरू असल्याने तिने हा प्रकार विनोद पवार यांना सांगितला त्यावेळी मी जादूटोणा करून अघोरी विद्येचे काम करतो मात्र मला त्यासाठी तुमच्या घरी जाऊन पहावे लागेल असे करत त्याने महिलेच्या घरात प्रवेश मिळवला. त्यानंतर तुमच्या घरावर कुणीतरी काळी जादू केली आहे म्हणून तुमच्या घरात असे प्रकार होत आहेत, असे सांगितले होते.

तुमचा नवरा हा सात महिन्यांपेक्षा जास्त जगणार नाही त्याकरता मला तुमच्या घराची बांधणी करून तांत्रिक विधी करावे लागतील असे म्हणत फिर्यादी कडून तीस हजार रुपये घेतले आणि अघोरी पूजा केली. त्यानंतर त्याने काळ्याजादूची भीती दाखवायला सुरू केले आणि महिलेकडून तब्बल वीस लाख रुपये उकळले. एवढे करूनही त्याचे समाधान झाले नाही म्हणून त्याने महिलेला गुंगीचा पदार्थ खायला दिला आणि तिच्यावर बलात्कार केला.

आपली पूर्णपणे फसवणूक झाल्याची जाणीव झाल्यावर सदर महिलेने पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर खंडणीविरोधी पथकाने चौकशी करून दहा मार्च रोजी आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपी पवार हा हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून यापूर्वी सांगली जिल्ह्यात त्याच्यावर दरोडा आणि वाकड पोलिस ठाण्यात देखील शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याचे समजते.


शेअर करा