‘ रोहित दार उघड ‘ आई हाका मारत होती तर.., नगरमधील घटना

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्‍यात उघडकीला आली असून घारगाव येथे एका तरुणाने रविवारी १३ तारखेला दुपारी दोनच्या सुमारास राहत्या घरात छताच्या अँगलला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. संगमनेर तालुक्यातील कानोरे मळा येथे ही घटना घडलेली असून अद्यापपर्यंत आत्महत्येचे कारण समजलेले नाही.

उपलब्ध माहितीनुसार, रोहित चंद्रकांत शिंदे ( वय 21 राहणार घारगाव ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून घटना घडली त्या दिवशी रोहितची आई कामानिमित्त पोलिस ठाण्यात तर वडील शेतीच्या कामासाठी गेले होते. दुपारी दोनच्या सुमारास आई घरी आल्यानंतर दरवाजा उघडला नाही म्हणून त्यांनी पुतण्या स्वप्निल याला बोलावले असता स्वप्निलने खिडकीतून डोकावून पाहिले त्यावेळी त्याने गळफास घेतल्याचे आढळून आले.

सदर घटनेची माहिती पोलिसांना समजताच पोलीस नाईक राजेंद्र लांघे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलेला आहे. अद्यापपर्यंत रोहित त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही तर पोलिस तपास सुरू असल्याचे समजते.


शेअर करा