महाराष्ट्र हादरला..शेजारच्या तरुणाचा मृतदेह तिने पाहिला अन, परिसरात वेगळीच चर्चा

शेअर करा

महाराष्ट्र्र अनेक धक्कादायक घटना उघडकीला येत असताना अशीच एक घटना नागपूर इथे समोर आलेली असून सावनेर शहरात किल्ला परिसरात एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली आणि त्याला फाशी लावलेल्या अवस्थेत पाहून बाजूलाच राहणाऱ्या तरुणीने घरी जाऊन गळफास घेत स्वत:चे जीवन संपवले. सध्या या घटनेला प्रेमसंबंध जोडून बघितले जात असले तरी मात्र पुढील तपासात या घटनेची सत्यता समोर येईल, असे ठाणेदार मारुती मुळूक यांनी सांगितले असून तपास सुरु आहे .

उपलब्ध माहितीनुसार, सावनेरच्या माताखेडी किल्ला परिसरात १४ तारखेला सकाळच्या सुमारास २२ वर्षीय आकाश प्रकाश लालबागे या तरुणाने घरात नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. सदर घटनेची माहीती मिळताच ठाणेदार मारुती मुळक आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले व मृतदेह व घटनास्थळाचा पंचनामा करुण मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी प्राथमिक आरोग्य प्रशिक्षण केंद्र सावनेर येथे रवाना केला.

एकीकडे ही कायदेशीर प्रक्रिया सुरु असतानाच शेजारी राहणाऱ्या किरण मारुती काकडे या तरुणीने देखील गळफास घेतल्याची बातमी मिळाली. तरुणीने दुप्पट्ट्याने गळफास घेतला असून तिला तात्काळ खाली उतरवून रुग्णालयात रवाना करण्यात आले मात्र तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. अचानक घडलेल्या प्रकारामुळे माताखेडी परिसराचे वातावरण शोकाकुल होऊन परिसरात वेगळीच चर्चा सुरु झाली आहे .

आकाश याने गळफास लावून आत्महत्या केल्याची बातमी मिळताच तरुणी त्याला पाहण्यासाठी त्याच्या घरी गेली होती आणि आकाशचा मृतदेह पाहून ती आपल्या घरी आली व दुपट्याने गळफास लावून आत्महत्या केली. ठाणेदार मारुती मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय शिवाजी नागवे, हेकाँ. विजय पांडे पुढील तपास करत असून सदर घटना ही प्रेमप्रकरणातून आहे किंवा नाही याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही.


शेअर करा