पुण्यात खळबळ..पती आणि त्याचे चार मित्र लांबून पाहत होते ‘ काय चाललंय ‘ ?

शेअर करा

सोशल मीडियावरील मैत्रीची अनेकदा सुखद अशी सुरुवात आणि क्वचितच सुखद असा शेवट होतो अशीच एक घटना पुणे शहरात उघडकीला आली असून इंस्टाग्रामवर झालेल्या ओळखीतून एका महिलेला अश्लील मेसेज पाठवून तिला रात्री भेटायला बोलवणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे.

सदर महिलेचा पती आणि त्याच्या साथीदारांनी या तरुणाला काठीने बेदम मारहाण केली तसेच महिलेने दिलेल्या तक्रारीवरून त्याच्या विरोधात विनयभंगाचा देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा पोलिसांनी या तरुणाला अटक केली असून हा प्रकार भाग्योदय नगर येथे सोमवारी रात्री नऊ वाजता बिकानेर स्वीट या प्रसिद्ध मिठाई दुकानाच्या समोर घडलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, अमर विजयकुमार जाधव ( वय 23 राहणार पाटील नगर बावधन ) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव असून एका 19 वर्षीय महिलेने त्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे अमर जाधव याची फिर्यादी महिलेशी काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर ओळख झाली होती. त्यानंतर त्याने तिला इन्स्टाग्रामवर अश्लील मेसेज आणि फोटो पाठवून तिचा विनयभंग केला.

14 मार्च रोजी त्याने या महिलेला भाग्योदयनगर येथे बिकानेर स्वीटच्या समोर भेटायला बोलावले होते यावेळी ती महिला तिथे पोहोचली आणि तिने मला मेसेज करू नकोस, असे समजावून सांगितले असता त्याने तिचा हात धरुन विनयभंग केला. महिलेसोबत आलेला तिचा पती आणि त्याचे चार मित्र लांब उभे राहून हा प्रकार पाहत होते मात्र त्याने तिचा हात धरला.

त्यांनी त्यांनतर तात्काळ हल्ला करून त्याच्या डोक्यावर आणि पाठीवर मारहाण करत त्याला जखमी केले. जाधव याने देखील सदर महिला आणि तिच्या पतीसह आणखी एक जणावर गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी अमर जाधव याला अटक केली आहे. सदर प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बिराजदार हे करत आहेत.


शेअर करा