नागपूर हादरले..’ करायला गेले एक झाले भलतेच ‘, आई अन मुलाला बेड्या

शेअर करा

महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना समोर आलेली असून दारूच्या नशेत गोंधळ घालणाऱ्या एका तरुणाला त्याचा भाऊ आणि आईने चांगलीच मारहाण करत केली आणि आई आणि भावाने केलेल्या मारहाणीनंतर या तरुणाचा मृत्यू झाला आहे. नागपूर येथील ही घटना असून शुभम अशोक नानोटे ( वय 22 ) असे मयत तरुणाचे नाव आहे.

शुभम हा ( नंदनवन झोपडपट्टी गल्ली नंबर 2 ) येथे राहात होता. बाजारामध्ये तो इमिटेशन पद्धतीने बनवलेले दागिने विकत असायचा. त्याची आई रंजना ( वय 45 ) ही केटरिंगच्या कामाला जायची तर भाऊ नरेंद्र ( वय 27 ) हा इलेक्ट्रिशियन म्हणून काम करत होता. हातात पैसे येत असल्याने शुभम याला दारूचे व्यसन लागले आणि त्यातून तो गेल्या काही महिन्यांपासून दारू पिल्यानंतर घरी त्रास देत असायचा.

रविवारी रात्री तो असाच घरी आला आणि आईला पाच हजार रुपये मागू लागला. आईने आपल्याकडे पैसे नाहीत असे त्याला सांगितले मात्र त्याने पैशावरून घरात गोंधळ घालायला सुरु केली. आरडाओरड झाल्यानंतर शेजारी देखील धावून आले मात्र त्याने त्यांना त्रास देत घराची भिंत फोडायला सुरू केली. आईने फोन करून शुभमचा मोठा भाऊ नरेंद्र याला बोलावून घेतले.

नरेंद्रने त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र तो त्याच्यावरच धावून गेला आणि त्यानंतर त्याला मारहाण करण्यात आली. संतप्त आईने नंदनवन पोलिस ठाण्यात तक्रार देखील नोंदवली. पोलिसांनी त्याला समज दिल्याने तो शांत झाला मात्र दरम्यानच्या काळात झालेल्या मारहाणीनंतर त्याला दवाखान्यात नेण्यात आले होते. मध्यरात्री दवाखान्यातून घरी आल्यानंतर आईने त्याला जेवू देखील घातले मात्र त्यानंतर तो झोपी गेला तो पुन्हा उठलाच नाही.

त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच नंदनवन पोलिसात खबर देण्यात आली आणि प्राथमिक मेडिकल अहवालात त्याचा मृत्यू गळा दाबून झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी शुभमचा भाऊ नरेंद्र आणि आई रंजना या दोघांना खुनाच्या आरोपाखाली अटक केली आहे. शुभम याचे 23 फेब्रुवारीला लग्न देखील झाले होते आणि त्यानंतर तो नंदनवन नगरमधील घर सोडून इतरत्र आपली पत्नी निकिता हिच्या सोबत राहायला गेला होता. तिथे देखील तो दारू पिऊन गोंधळ घालत असायचा अशाच एका प्रकारात रविवारी दारूसाठी आईकडे पैसे मागण्यासाठी आला होता त्यानंतर हा दुर्दैवी प्रकार घडला आहे.


शेअर करा