नगर ब्रेकिंग..गाडीत गोमांस भरून गाडी निघणार इतक्यात..

गेल्या काही वर्षांपासून संगमनेरची ओळख दुर्दैवाने कत्तलखान्याचे हब म्हणून होत असल्याचे दिसून येत आहे. काही महिन्यांपूर्वी संगमनेर येथील गोवंश कत्तलखान्यावर झालेल्या सर्वात मोठ्या कारवाईनंतरदेखील संगमनेर येथील कत्तलखाने चोरून-लपून सुरूच असल्याचे दिसून येत आहे. अशाच एका कत्तलखान्यातुन गोमांसाची वाहतूक होणार असल्याच्या गुप्त माहितीवरून शहर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एका मालट्रकसह तीनशे किलो गोमांस असा सुमारे अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मदिनानगर भागातील एका अवैध कत्तलखान्यातून कत्तल केलेल्या गोवंश मांसाची बाहेरगावी निर्यात करण्यात येणार असल्याच्या माहितीवरून पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली 20 तारखेला पहाटे तीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

घटनास्थळी मालट्रक आणि सुमारे 300 किलो वजनाचे पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे गोवंश मांस आढळून आले. पोलीस पथकाने सदर प्रकरणी तौफिक ताहीर कुरेशी ( राहणार भारत नगर ) गुलाम फरीद कुरेशी ( राहणार मोगल पुरा ) यांना ताब्यात घेतले तर शमसुद्दीन कुरेशी ( राहणार मदिना नगर ) हा पळून गेला आहे.