पुण्यात बलात्कार प्रकरणात ‘ सेटलमेंट ‘ करून देणारी महिला पोलीस उपनिरीक्षक निलंबित

शेअर करा

राज्यात महिला अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत असताना पोलीस दलात महिला आहे म्हणून आपल्याला मदत होईल अशा आशेने अनेक महिला पोलिसात धाव घेतात मात्र त्यांच्या या संकल्पनेला छेद देणारी एक घटना पुणे येथे उघडकीला आली असून महिला पोलीस अधिकारी महिलेवरच अन्याय करत असल्याचे या घटनेत दिसून आलेले असून त्यांना निलंबित करण्यात आले आहे .

बलात्काराच्या तक्रार अर्जात तडजोड करण्यास भाग पाडून संबंधित व्यक्तीच्या घरी जाऊन पाच लाख रुपये रोख आणि दहा लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट एका महिला पोलीस उपनिरीक्षकाने घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. अप्पर पोलीस आयुक्तांनी सदर महिला पोलीस उपनिरीक्षक मोहिनी डोंगरे यांना या प्रकरणी निलंबित केले असून बाल लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडे असताना आणि आणि कोणताही अधिकार नसताना महिला पोलीस उपनिरीक्षक यांनी परस्पर तपास करून लॉज मालक, साक्षीदार यांच्याकडे एक लाख रुपयांची मागणी केली होती. पोलिसांना मिळालेल्या माहितीत धक्कादायक बाब समोर आली.

संबंधित व्यक्तीच्या घरी जाऊन पाच लाख रुपये रोख आणि दहा लाख रुपयांचा बेरर चेक जबरदस्तीने घेतला असे या व्यक्तीचे म्हणणे असून संबंधित व्यक्तीने वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडे उपनिरीक्षक असलेल्या डोंगरे यांच्या विरुद्ध तक्रार केली होती. सदर तक्रार अर्जाच्या चौकशी दरम्यान डोंगरे यांनी गैरकृत्य केल्याचे समोर आले असून डोंगरे यांनी आणखी एका गुन्ह्यात पॉक्सो या गुन्ह्यात तब्बल 87 दिवसांनी दोषारोपपत्र दाखल केल्याची बाब देखील समोर आली आहे .


शेअर करा