पुण्यात खळबळ..’ बायको पण आहे सोबत तुम्ही पण चला ‘ म्हणत त्याने गाडीत बसवले अन ..

शेअर करा

गेल्या काही वर्षांपासून पुणे जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण चांगलेच वाढलेले असून शिक्रापूर येथील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या मैत्रिणीसह देवदर्शनाला घेऊन जाण्याच्या बहाण्याने कारमध्ये घेऊन तिला जबरदस्तीने दारू पाजली आणि तिचा विनयभंग केला, अशी धक्कादायक घटना समोर आलेली आहे. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सागर वर्पे या युवकावर ॲट्रॉसिटीसह बाललैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पीडित अल्पवयीन युवती ही तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली होती त्यावेळी सागर वर्पे हा कार घेऊन मैत्रिणीच्या घरासमोर आला आणि हॉर्न वाजवून त्या युवतीला आणि तिच्या मैत्रिणीला घराबाहेर बोलून घेतले. आपण नारायणपूरला देव दर्शनाला जाऊ, माझी पत्नी देखील माझ्यासोबत आहे तुम्ही पण चला, असे म्हणत त्याने त्यांना कारमध्ये बसवले आणि तो घेऊन गेला.

शिक्रापूरपासून काही अंतर गेल्यानंतर सागर याने कोल्ड्रिंक आणि दारू घेतली आणि कारमध्ये बसवून युवती आणि तिच्या मैत्रिणीला जबरदस्तीने दारू पाजली आणि त्यानंतर त्यांचा विनयभंग केला अशी तक्रार देण्यात आलेली आहे.


शेअर करा