‘ पुणे तिथे काय उणे ‘, लॉकअपमधून फरार आरोपीचा कारनामा : पहा व्हिडीओ

शेअर करा

पुणे तिथे काय उणे असे म्हणतात ते उगाच नाही अशीच एक घटना पुणे जिल्ह्यात उघडकीला आली असून लॉकअपच्या 2 गजामधून आरोपी पळून जाऊ शकतो यावर पोलिसांचा देखील विश्वास बसला नाही मात्र सदर आरोपीने पोलिसांना हे प्रात्यक्षिक करून दाखवले आणि पोलिस देखील अवाक झाले. चाकण पोलीस ठाण्यातील हा प्रकार असून एक लुकडा सुकडा सडपातळ आरोपी लॉकअपच्या दोन गजामधून पसार झाला होता.

उपलब्ध माहितीनुसार, कुणाल असे त्याचे नाव असून पोलीस अंमलदार लॉकअपजवळ आले तेव्हा तो दिसून आला नाही . लॉकअपला बाहेरून कुलूपच लावलेले असताना तो गेला कसा याचा तपास पोलिसांनी सुरू केला आणि त्याला काही तासातच पुन्हा ठोकण्यात आल्या. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर तू गेला कसा असे विचारले असताना त्याने दोन गजांच्या मधून आपण सटकलो असे सांगितल्यानंतर पोलिसांनी देखील त्याला प्रात्यक्षिक करून दाखवायला सांगितले.

प्रात्यक्षिक करून दाखवायचे म्हटल्यानंतर कुणाल याने अवघ्या दोन ते तीन सेकंदात दोन गजामधून यशस्वीरित्या बाहेर येऊन दाखवले आणि पोलीस देखील अवाक झाले. पोलिसांनी त्याच्या या प्रकाराचा व्हिडिओ बनवला आणि इतर पोलिस ठाण्यात देखील शेअर केला असून खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.


शेअर करा