पुणे हादरलं..20 वर्षीय तरुणाची दुकानात घुसून कोयत्याने वार करुन हत्या

शेअर करा

गेल्या काही वर्षांपासून पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले पहायला मिळत असताना एका तरुणाची सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्याजवळ एका तरुणाची कोयत्याने वार करुन हत्या करण्यात आली आहे पूर्ववैमनस्यातून हत्या झालाचा संशय पोलिसांना असून मारुती लक्ष्मण ढेबे असं 20 वर्षीय तरुणाचं नाव आहे. 23 मार्च रोजी भर वर्दळीच्या ठिकाणी खून झाल्याने काही काळ परिसरात देखील गोंधळ उडालेला होता.

मयत मारुती ढेबे हा नांदेड फाट्यापासून नांदेड गावाकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ असलेल्या बालाजी स्क्रॅप सेंटर या दुकानात बसलेला असताना संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास पाच ते सहा जणांचं टोळकं एका लाल रंगाच्या कारमधून आलं आणि त्यांनी दुकानात शिरून तरुणावर कोयत्याने हल्ला केला. त्यांनी केलेल्या हल्ल्यात मारुती ढेबे हा जागीच मृत्युमुखी पडला.हल्लेखोरांनी तोंडाला रुमाल बांधलेले असल्याने त्यांची ओळख पटवण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

खुनाची माहिती मिळताच हवेली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी ससून रुग्णालयात पाठवला असून हवेली पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.दरम्यान ही सर्व घटना दुकानासमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून हल्ल्याच्या वेळी आरोपींनी तोंडाला रुमाल बांधला होता. त्यामुळे हल्लेखोरांना पकडण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.


शेअर करा