महाराष्ट्र हादरला..बायकोच्या प्रियकराचा चक्क घरात घुसून खून , क्रूरतेचा कळस म्हणजे..

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना जळगाव इथे उघडकीला आली असून शहरातील समता नगरात सागर नरेंद्र पवार (वय २८) या तरुणाचा खून करण्यात आला आहे . क्रूरतेचा कळस म्हणजे चक्क पोती उचलण्याच्या हूकने मानेवर हल्ला करण्यात येऊन त्याचा जीव घेण्यात आला आहे . २६ तारखेला पहाटे पावणे तीन वाजता घरातच त्याच्यावर हल्ला झाला.

उपलब्ध माहितीनुसार, अमित खरे असे मारेकऱ्याचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. सागर याचे अमित खरे याच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते, त्यातून हा खून झाल्याचे घटनास्थळावरील लोकांनी तसेच मयताच्या नातेवाईकांनी सांगितले असून घटनेत इतरही काही कारण आहे का ? याचाही पोलीस शोध घेत आहेत. सागर हा समतानगरात एकटाच राहत होता आणि मोलमजुरी करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. त्याची आई मानसिक रुग्ण असून, वडील बाहेरगावी राहत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमितने शनिवारी पहाटे सागरच्या घरी जात त्याच्यावर शस्त्राने वार केले. अमित याने केलेल्या हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या सागरला नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केल मात्र रक्तस्राव थांबत नसल्याने त्याला खासगी रुग्णालयात हलविण्यात आलं पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.


शेअर करा