‘ मेरे प्यारे देशवासियो घ्या अच्छे दिन ‘, गॅस हजारांवर तर मोदी विजय उत्सवात

शेअर करा

पाच राज्यातील निवडणुका पार पडल्यानंतर देशात महागाईचा आगडोंब उसळला असून रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सरासरी 80 पैशाची वाढ होत आहे तर घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमध्ये देखील तब्बल 50 रुपयांची वाढ झाली आहे. नगर शहरात गॅस बुकिंग केल्यास गॅस सिलेंडरची किंमत आता तब्बल 963 रुपयांपर्यंत पोचली असून काही ठिकाणी डिलिव्हरी बॉयला वीस रुपये अधिक द्यावे लागत असल्याने सिलेंडरची किंमत 983 रुपये झालेली पाहायला मिळते आहे.

पाच राज्यात निवडणुका असल्याने गेल्या चार ते पाच महिन्यांपासून इंधनाचे दर स्थिर होते मात्र निवडणुका झाल्या आणि केंद्र सरकारने तेल कंपन्यांना दर वाढविण्यास फ्रीहँड दिला त्यानंतर इंधनाच्या दरात वाढ झाली असून घरगुती सिलेंडर देखील महाग झालेले पाहायला मिळते आहे.

उज्वला गॅस योजनेचा गॅस देखील महाग झालेला असून सामान्य व्यक्तींना महागडे इंधन वापरणे याव्यतिरिक्त पर्याय राहिलेला नाही. ग्रामीण भागात नागरिकांनी पुन्हा चुली पेटवण्यास सुरुवात केलेली असून खाली झालेले सिलेंडर घरात पडून आहेत. कोरोनाच्या संकटात अनेक नागरिक आर्थिक संकटात देखील सापडले होते मात्र त्यानंतर देखील नागरिकांचा कुठलाच विचार न करता महागाई प्रचंड प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहे.

केंद्र सरकारकडून देण्यात येणारी सबसिडी आता इतिहासजमा झालेली असून गॅस सिलेंडर पूर्वी 450 रुपयांना मिळत होते त्यातदेखिल सबसिडी दिली जायची मात्र आता गॅस सिलेंडर च्या किमती तर वाढत आहे आणि सबसिडी जवळपास बंद झाल्याचे दिसून येत आहे. सबसिडी देखील सात रुपये तीस रुपयापर्यंत मिळत होती मात्र ही देखील आता बंद झालेली दिसून येत आहे.

शहरी भागात चूल पेटवणे शक्य नसले तरी गॅसचे दर आता जवळपास एक हजार रुपयांपर्यंत पोहोचलेले असल्याने पोटाला चिमटा घेऊन गॅस सिलेंडर खरेदी करावा लागत असल्याचे दुर्दैवी चित्र निर्माण झाले आहे. देशातील गोदी मीडिया या विषयावर चकार शब्द उच्चारायला तयार नाही मात्र केवळ रशिया युक्रेन वाद आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचे कार्य इलेक्ट्रॉनिक मीडियाकडून केले जात आहे.


शेअर करा