‘ मला माफ करा ती.. ‘ म्हणत हत्या करणारा तलाठी अद्यापही फरार : काय आहे प्रकरण ?

शेअर करा

आठ महिन्यांपूर्वी पुणे शहरानजीक पिंपरी येथे डॉक्टर पत्नीचा अमानुषपणे खून करणारा तलाठी आठ महिन्यांपासून फरार असल्याची माहिती पुढे आलेली आहे. इतके दिवस एखादा व्यक्ती खून करून फरार कसा राहू शकतो ? हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. माझ्या मुलीच्या मारेकऱ्याला शोधा अशी विनवणी तिचे आई-वडील करत असून बोराडेवाडी मोशी येथे सहा सप्टेंबर २०२० रोजी ही घटना उघडकीला आली होती

सरला विजय साळवे ( वय 32 ) असे खून झालेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे तर विजयकुमार गजानन साळवे ( वय 32 राहणार बोराडेवाडी मोशी ) असे फरार तलाठीचे नाव असल्याचे समजते. भंडारा जिल्ह्यातील सरला आणि गोंदिया जिल्ह्यातील विजयकुमार यांचा 2019 मध्ये प्रेमविवाह झाला होता त्यानंतर त्यांनी मोशी येथे फ्लॅट खरेदी केला आणि नवीन फ्लॅटची 4 सप्टेंबर २०२१ रोजी त्यांनी वास्तुशांती देखील केली. त्यानंतर विजयकुमार याने सरला यांचा खून केला आणि चिठ्ठी लिहून तो पसार झाला.

प्रेमविवाह केल्यानंतर सरला आणि विजय कुमार यांचा सुखाने संसार सुरू होता मात्र विजय कुमार याच्या मनात सरला यांच्या चारित्र्याविषयी संशय निर्माण झाला आणि त्यांच्या सुखी संसाराला दृष्ट लागली. त्यातून त्याने त्यांचा खून केल्याची माहिती पुढे आलेली आहे

तब्बल आठ महिन्यांपासून हा व्यक्ती फरार असून अद्याप देखील त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही तर दुसरीकडे सरला यांचे वडील यांनी सरला आणि विजय कुमार यांचा प्रेमाने संमती देत आम्ही विवाह लावून दिला होता. विजय कुमार याचा जावई म्हणून आम्ही स्वीकारही केला होता मात्र तरीदेखील आम्ही आमच्या मुलीला गमावले आहे. तिच्या मारेकर्‍याचा शोध घेऊन तिला न्याय मिळणे अपेक्षित आहे, अशी खंत व्यक्त केली आहे.


शेअर करा