पुण्यात खळबळ..शिक्षिकेच्या बाथरूममध्ये ‘ काहीतरी ‘ म्हणून सावध झाली खरी मात्र ..

शेअर करा

पुणे इथे एक धक्कादायक घटना समोर आलेली असून शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेच्या बाथरूममध्ये मोबाईल लपवून 16 वर्षाच्या मुलाने चित्रिकरण केल्याचा गंभीर प्रकार समोर आलेला आहे . विद्यार्थी असलेला हा मुलगा सध्या दहावीत शिकत असून त्याच्या आई वडिलांनी त्याच्यासाठी मागील पाच वर्षांपासून इंग्रजी विषयाची खाजगी शिकवणी लावली होती. मुलगा 10-11 वर्षाचा असल्यापासून सदर शिक्षिका या मुलाला इंग्रजी शिकवते. हा प्रकार समोर आल्यावर शिक्षिकेने पोलिसात धाव घेतलेली आहे .

उपलब्ध माहितीनुसार, पीडित शिक्षिका कोथरुडमधील त्याच्या घरी त्याला शिकवायला जात होती. काल ही शिक्षिका त्याच्या घरातील बाथरुमचा वापर करण्यासाठी गेली असता आत साबणाच्या खोक्याच्या मागे काहीतरी चमकताना या शिक्षिकेला दिसले. साबणाचे खोके बाजूला केले असता शिक्षिकेला धक्काच बसला कारण तिथे चक्क मोबाईल ठेवलेला होता आणि त्यात व्हिडीओ रेकॉर्डिंग होत असल्याचे या शिक्षिकेच्या लक्षात आले.

पीडित शिक्षिका मोबाईल घरी घेऊन गेली आणि तिने मोबाईल तपासला असता त्यामध्ये तिचे चक्क बाथरुममध्ये केले गेलेले चित्रीकरण आढळून आले तसेच काही फोटो आणि व्हिडीओ देखील तिला सापडले आणि त्यानंतर तिने पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलाविरुद्ध तक्रार दिली. पोलीसांनी आयटीएक्ट नुसार या मुलाच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला असून या मुलाला बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात येणार आहे.


शेअर करा