महाराष्ट्र हादरला..प्रियकरासोबत नवऱ्याला मारहाण करून बायको पळाली म्हणून पतीने..

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना जळगाव जिल्ह्यात रावेर नजीक उघडकीला आली आहे. दहा वर्षाचा मुलगा आणि सात वर्षाची मुलगी असलेल्या एका विवाहितेचे परिसरात राहणाऱ्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले आणि त्यानंतर पत्नी त्याच्या इतकी आहारी गेली की तिने त्याला हाताशी धरून पतीला शिवीगाळ आणि मारहाण केली आणि त्यानंतर प्रियकरासोबत घरातून पलायन केले. अचानकपणे पत्नी घरातून निघून गेल्यानंतर पत्नी पतीला प्रचंड मानसिक धक्का बसला आणि त्याने गळफास घेत आत्महत्या केली. अहिरवाडी येथे ही घटना उघडकीला आली असून घरातून पळून गेलेल्या पत्नी आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, ईश्‍वर रमेश मेढे ( वय 32 ) आणि त्याची पत्नी कोमल हे मोलमजुरी करणारे कुटुंब असून त्यांना एक दहा वर्षाचा मुलगा आणि सात वर्षाची मुलगी आहे. कोमल हिचे शेजारी राहत असलेल्या अमोल समाधान वानखेडे याच्यासोबत सूत जुळले आणि त्यानंतर याची कुणकुण पती ईश्वर याला लागली . त्यांच्या अनैतिक संबंध आवरून घरात सातत्याने भांडणे होत होत.

ईश्‍वर घरी आला असता पत्नी कोमल हिच्यासोबत त्याची कुरबुर सुरू होती त्याच वेळी तिचा प्रियकर समाधान अमोल समाधान वानखेडे हा त्यांच्या घरात आला आणि अनैतिक संबंधातून त्यांनी मिळून ईश्वर यास मारहाण केली आणि ‘ मरून जा एकदाचा ‘ असे म्हणत धमकी देखील दिली अखेर ईश्वरची वहिनी आणि परिसरातील काही शेजाऱ्यांनी येऊन वाद मिटवला.

रात्री मुलगा आणि मुलगी झोपलेली असताना आपली पत्नी ही घरात आढळून आली नाही ही बाब ईश्वर याच्या ध्यानात आली. त्याने त्याची वहिनी आणि आईला ही घटना सांगितली आणि तिची शोधाशोध घरच्यांनी सुरू केली तर दुसरीकडे ईश्वर याने राहत्या घरात गळफास घेतला. सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना उघडकीला आली. ईश्वर याच्या धाकट्या भावाची पत्नी संगीता मेढे यांनी यासंदर्भात पोलिसात कोमल ईश्वर मेढे आणि शेजारचा युवक अमोल समाधान वानखेडे या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.


शेअर करा