पुण्यात ‘ त्या ‘ योजनेला नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद , फक्त इतकेच अर्ज आले

शेअर करा

पुणे शहरातील महापालिका हद्दीतील गुंठेवारीतील घरे नियमित करण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्याची मुदत आता 30 जूनपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. 10 जानेवारी रोजी ही मोहीम सुरू केली होती आणि 31 मार्च रोजी संपली होती मात्र त्यानंतर पुन्हा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी 30 जूनपर्यंत ही मुदतवाढ दिली असून पुणेकरांचा अपेक्षित असा प्रतिसाद या मोहिमेला दिसून आला नाही आतापर्यंत फक्त 77 प्रस्ताव दाखल झालेले असल्याने आपली बांधकामे नियमित करून घेण्यासाठी पुणेकर देखील आग्रही दिसून येत नाहीत.

गुंठेवारी नियमित करण्यासाठीच्या जाचक अटी आणि शर्ती तसेच या प्रकरणी असलेल्या किचकट प्रक्रियेमुळे अनेकजणांनी याकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. सदर प्रस्ताव हे आर्किटेक आणि इंजिनिअरच्या माध्यमातून सादर करावे लागणार असल्याने त्यांची फी परवडत नसल्याने देखील अनेकांनी या योजनेकडे पाठ फिरवली आहे.

महापालिकेने प्रस्ताव दाखल करण्यासाठी आर्किटेक आणि इंजिनियरने पाच हजार रुपये फी आकारावी असे आवाहन केलेले आहे मात्र महापालिकेच्या या आवाहनाला पुण्यातील आर्किटेक्ट आणि इंजिनियर यांचाही अपेक्षित असा प्रतिसाद देत नसल्याचे दिसून येत आहे तर नागरिक देखील पाठ फिरवत असल्याने मुदत वाढवण्यात आलेली आहे.


शेअर करा