.. अन सतिष उके यांना न्यायालयातच अश्रू अनावर , फडवणीस यांच्यावर गंभीर आरोप

शेअर करा

नाना पटोले यांचे वकील सतिष उके यांना जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडीने अटक केली आहे. न्यायालयात त्यांना हजर केले असताना आपली बाजू मांडताना सतिष उके यांना अश्रू अनावर झाले त्यानंतर तीन तासाच्या युक्तिवादानंतर सतिष उके आणि त्यांचे भाऊ प्रदीप उके यांना सहा एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे.

ईडीकडून त्यांना 14 दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती. सतिष उके यांनी आपली बाजू मांडताना ईडीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. फडणवीस यांच्या एका सहकाऱ्याने आपल्याला धमकावण्याचे देखील त्यांनी न्यायालयात सांगितले तसेच मी घरात झोपेत असताना सीआरपीएफचे जवान एके-47 घेऊन घरात आले.

माझे वडील आजारी आहेत. मी आधी आर्किटेक होतो त्यानंतर कायद्याचे शिक्षण घेऊन 2007 साले वकिली सुरू केली. मी फडणवीस आणि गडकरी यांच्या विरोधातील खटले लढलो आहे. माझ्यावर सीबीआयच्या विशेष न्यायालयातील माजी न्यायाधीश लोया यांच्या केसमध्ये दबाव टाकण्यात आलेला आहे, असा देखील युक्तिवाद केला मात्र याच दरम्यान त्यांना रडू कोसळले.

दुसरीकडे सतिष उके यांच्या वतीने त्यांचे वकील रवी जाधव यांनी देखील ईडीने बेकायदेशीर पद्धतीने अटक केल्याचे नमूद केले. अटकेनंतर उके यांना 24 तासात कोर्टात हजर करण्याचे गरजेचे असताना त्या पद्धतीचे पालन करण्यात आले नाही. ईडीचे अधिकारी कायदेशीर प्रक्रिया पार पाडत नाहीत, अटकेचा मेमो देखील देण्यात आलेला नाही, असे सांगण्यात आले.


शेअर करा