लॉकडाऊनचे नियम फाट्यावर मारत भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार खेळले क्रिकेट : व्हिडीओ व्हायरल

शेअर करा

देशात कोरोनामुळे सर्व नागरिक भीतीच्या सावटाखाली असताना भाजपच्या नेत्यांना मात्र याचे काहीच गांभीर्य नसल्याचे चित्र केवळ महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशात आहे .अशातच भाजपच्या नेत्याचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या सूचना पालन करण्याचे नागरिकांना सांगण्यात आले असले तरी ते जनतेसाठी आहे आपल्यासाठी नाही अशा अविर्भावात भाजपचे नेते वागत आहेत. मदत करणे वगैरे यांच्या गावी नाहीच मात्र, आहे त्या सरकारवर टीका करणे आणि नियम तोडणे यासाठीच आपण आहोत की काय अशी परिस्थिती भाजपने देशात निर्माण केली आहे . भाजपाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष आणि खासदार मनोज तिवारी हे दिल्ली सरकारवर रोज टीका करत असून स्वत: मात्र सर्रास लॉकडाऊनचे नियम तोडत आहेत. मनोज तिवारी ते दिल्लीचे भाजपसाठीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार होते मात्र दिल्लीकरांनी त्यांना साफ नाकारले.

मनोज तिवारी हे रविवारी सोनिपतच्या गन्नौर येथे क्रिकेट खेळताना दिसले. मास्क न घालता ते क्रिकेट खेलत होते. यावेळी त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नाहीच मात्र क्रिकेट मॅच खेळताना त्यांनी तेथे उपस्थित लोकांसाठी गाणे देखील म्हणून आपले कौतुक करून घेतले. ह्या मॅचमध्ये त्यांनी गोलंदाजीही केली. मात्र खेळताना त्यांनी मास्क देखील घातला नव्हता. मात्र गोष्ट इतक्यावर थांबली नाही, ह्याच घटनेचा एक व्हिडीओ बनवून देखील त्यांनी ” देव सर्वांची खेळ भावना भरभरून ठेवुदे. सर्व निरोगी राहुदे, सर्वांची इम्युनिटी चांगली राहुदे : असे म्हणत शेअर केला .

मनोज तिवारी यांच्या या लॉकडाऊन तोडल्याची चर्चा रंगल्यानंतर सोनिपत प्रशासनावर सोशल मीडियमधून टीकेचा भडीमार होत असून आतापर्यंत या प्रकरणी मनोज तिवारींकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. या प्रकरणावरून तिवारी सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत

संबंधित बातम्या

” तेव्हा ” काळ्या चड्ड्या बनियन घालून आंदोलन केलं असत तर महाराष्ट्राने पाठ थोपटली असती : संजय राऊत
https://nagarchaufer.com/?p=59

भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या हातात ‘ फडणवीस हटाव ‘ चा फलक ? : जाणून घ्या काय आहे वस्तुस्थिती
https://nagarchaufer.com/?p=62

महिला मित्रासोबत रंगेहाथ धरले जाऊ नये म्हणून बाल्कनीतून मारली उडी : भाजपच्या नेत्याचा प्रताप
https://nagarchaufer.com/?p=89

३१ मे नंतर लॉकडाऊन राहणार कि उठणार, काय म्हणाले उद्धव ठाकरे ? : संपूर्ण व्हिडीओ
https://nagarchaufer.com/?p=111

आरती कीजै नरेन्द्र ललाकी म्हणत नरेंद्र मोदींची आरती झाली लाँच…काय आहेत आरतीचे बोल ?
https://nagarchaufer.com/?p=103

अंकल..तुम्ही आदराच्या लायकीचेच नाही, स्वरा भास्करच्या निशाण्यावर कोण ?
https://nagarchaufer.com/?p=123


शेअर करा