सुशांत सिंग राजपूतची हत्या कुत्र्याच्या बेल्टने करण्यात आली ? : महत्वाच्या व्यक्तीचा ‘ धक्कादायक ‘ दावा

शेअर करा

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणात रोज नवीन नवीन दावे केले जात आहेत . रिया चक्रवर्तीची चौकशी सुरु असून लवकरच सत्य बाहेर येईल असा सुशांतच्या चाहत्यांना विश्वास आहे . आता ह्या प्रकरणाचा तपास सीबीआय करत असून सीबीआयनेही या प्रकरणात गुन्हा नोंदवला आहे. सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाली आहे असा आरोप राज्यातील विरोधकांनी केला आहे मात्र आता ह्या प्रकरणात सुशांत सिंगचा माजी सहकारी अंकित आचार्य यांनी एक खळबळजनक दावा केला आहे .

अंकित आचार्य हा व्यक्ती आहे जो सुशांतसोबत २४ तास राहत होता. मात्र रिया सुशांतच्या आयुष्यात येताच तिने अंकितला कामावरुन काढून टाकलं. सुशांत आत्महत्या करणार नाही तर त्याची हत्या झाली आहे असा आरोप त्याने केला आहे मात्र आपल्या म्हणण्याला आधार म्हणून त्याने जे सांगितले आहे ते ऐकून निश्चितच विचार करण्यास भाग पाडल्याशिवाय राहत नाही .

अंकित आचार्यनं म्हटलं आहे की, सुशांत आत्महत्या करु शकत नाही. मी सुशांत भैयाला चांगलं ओळखतो, ही आत्महत्या आहे यावर माझा विश्वास नाही. ही निश्चितच हत्या आहे. जर आपण मान्य केले ही आत्महत्या आहे मग सुशांतच्या गळ्याभोवती O मार्क कसा आला? जेव्हा कोणी आत्महत्या करतो त्याच्या गळ्याभोवती U शेप येतो, जर सुशांतने आत्महत्या केली असेल तर त्याचे डोळे आणि जीभ बाहेर कशी आली नाही यामुळे ही हत्याच आहे.

अंकित आचार्य पुढे म्हणतात, माझ्याकडे सुशांतच्या मृतदेहाचे फोटो आहेत, आरोपींनी त्या डॉगच्या बेल्टने सुशांतची गळा दाबून हत्या केली आहे.सुशांतच्या गळ्याभोवती निशाण कोणते आहे याबद्दल त्याने दावा केला की, हे निशाण सुशांत राजपूतच्या डॉग फजच्या बेल्टचं निशाण आहे. सुशांत राजपूतला न्याय मिळावा तसेच दोषींना फाशी दिली जावी, अशी देखील मागणी करताना सीबीआयकडे प्रकरण गेल्यानंतर अंकित यांनी समाधान व्यक्त केले आहे . अंकित आचार्य हा सुशांतचा एक्स असिस्टेंट आहे, जो आधी सुशांतसोबतच राहत होता.


शेअर करा