महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना उघडकीला आली असून ‘ तेरे बिन नही जीना मर जाना ढोलना ‘ असे प्रेमपत्र लिहून एका तरुण अभियंत्याने औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पिंपळवाडी येथे राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सोमवारी सकाळी हा प्रकार समोर आला असून निखील दत्तात्रेय चांडोले ( वय 25 मूळ गाव पंढरपूर सध्या राहणार पिंपळवाडी तालुका पैठण ) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
निखिल हा एमआयडीसी पैठण येथे एका खाजगी कंपनीत काम करत होता. सोमवारी सकाळी तो घराच्या बाहेर न पडल्याने शेजाऱ्यांनी चौकशी केली असता तो त्याच्या घरात फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांना त्याच्या खोलीत काही प्रेमपत्रे आढळून आल्याने प्रेमप्रकरणातून त्याने हा प्रकार केल्याचा अंदाज आहे. त्यातील एका पत्रात त्याने ‘ तेरे बिन नही जीना मर जाना ढोलना ‘ असे हिंदी चित्रपटातील गाण्याचे बोल देखील लिहिले असल्याचे समजते.
निवृत्त नायब तहसीलदार दत्तात्रय चांडोले यांचा निखिल हा एकुलता एक मुलगा होता. या घटनेमुळे चांडोले कुटुंबीय शोकसागरात बुडाले असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.पोलिसांना सापडलेल्या चिठ्ठीमध्ये त्याने “तेरे बिन नहीं जीना मर जाना ढोलना” या हिंदी चित्रपटातील गाण्याच्या ओळी लिहिल्या आहेत. निखिलने इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले आहे. तो पैठण एमआयडीसी येथील एका कंपनीत नोकरी करत होता.