महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना नागपूर येथे उघडकीला आली असून आपण पोलिस दलात नियुक्त होणार आहोत असे आमिष दाखवत नांदेड जिल्ह्यातील एका भामट्याने फेसबुकवर एका तरुणीसोबत मैत्री केली आणि तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले त्यानंतर अश्लील फोटो नातेवाईकांना पाठवून तिला ब्लॅकमेल देखील करण्यात आले. सदर प्रकरणी पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, सोपान बालाजी बाशिंगे ( वय 27 ) असे आरोपीचे नाव असून तो नांदेड जिल्ह्यातील मुरकेवाडी येथील रहिवासी आहे. फेसबुक फ्रेंड बनवत त्याने कळमण येथील एका पंचवीस वर्षीय तरुणीशी मैत्री केली होती. आपली लवकरच पोलिस दलात निवड होणार असून मला तुझ्याशी लग्न करायचे आहे असे तो म्हणाला आणि जानेवारी महिन्यात तिला भेटण्यासाठी नागपूर येथे आला होता.
सीताबर्डी येथील एका हॉटेलात नेऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि तिचे नको त्या अवस्थेतील फोटो देखील काढले. ते तिला दाखवत वारंवार तिला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी त्रास देऊ लागला. तिने विरोध केल्यावर त्याने तिचे ते फोटो नातेवाईकाला पाठविण्याची धमकी दिली त्यावरून त्या तरुणीच्या मनात त्याच्यावर विषयी संशय निर्माण झाला आणि तो पोलिस दलामध्ये नसून त्याने आपली फसवणूक केली असे तिला वाटू लागले आणि तिने त्याला टाळायला सुरू केले मात्र तरीदेखील तो त्रास देत असल्याने अखेर पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेतली.