‘ लफडेबाज ‘ बायको प्रियकरासोबत फरार , पती पुणे सोडून गावी आला अन ..

शेअर करा

महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना उघडकीला आलेली असून पुणे महानगरपालिका परिवहन मंडळाकडे वाहक म्हणून काम करत असलेल्या एका तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी त्याच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीवरून त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर या दोघांच्या विरोधात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पुण्यात नोकरी करत असलेल्या माधव प्रभाकर ढाकणे ( वय ३३ ) या तरुणाने परळी तालुक्यातील अस्वलआंबा या गावी जाऊन मंगळवारी आत्महत्या केली होती. त्याच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोट वरून पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या धमक्यांना कंटाळून आपण आत्महत्या करत आहोत, असे म्हटले आहे.

3 एप्रिल रोजी माधव हे दुचाकीवरून त्यांच्या गावी अस्वलआंबा येथे आले होते. कुटुंबीयांनी तू एकटा का आलास असे विचारले असताना त्याने पत्नी शोभा ही जाकिर मुजावर ( राहणार गोंधळी नगर हडपसर पुणे ) याच्या सोबत पळून गेल्याचे सांगितले आणि माधव यांनी पुण्यातील हडपसर पोलिसात पत्नी बेपत्ता असल्याची देखील तक्रार नोंदवली आहे असेही सांगितले. पोलिसांनी तिचा शोध लावला मात्र तिने ऐन वेळी पोलीस आल्यावर आपण स्वखुषीने त्याच्यासोबत आलेलो आहोत असे सांगितले. माधव यांनी मुलाचा ताबा दे असे म्हटले असताना तिने आणि तिच्या प्रियकराने आता गुपचूप पुणे सोडून निघून जा अन्यथा तुला जीवे मारू अशी धमकी दिली.

हतबल झालेले माधव यांनी दुचाकीवरून आपले गाव गाठले आणि झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. अंबाजोगाई ग्रामीण पोलिसात पंचनामा करण्यात आला तेव्हा त्यांच्या पॅन्टच्या खिशात ही सुसाईड नोट आढळून आली होती. त्यात त्यांनी शोभा आणि तिचा प्रियकर जाकीर मुजावर यांच्या धमक्यांना कंटाळून आत्महत्या करत असल्याचे सांगितले होते. मुलाला आपण त्यांच्याकडून घेऊन यावे अशी विनंती देखील त्यांनी चिठ्ठीद्वारे केलेले असून मयत माधव यांचे भाऊ बालाजी प्रभाकर ढाकणे यांनी यासंदर्भात शोभा आणि तिचा प्रियकर जाकीर मुजावर यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.


शेअर करा