रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठेला ‘ इथेही ‘ निराशा आली हाती

शेअर करा

नगर येथील बहुचर्चित रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी बाळ बोठे याचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावलेला आहे.

रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठे याने औरंगाबाद खंडपीठात जामीन अर्ज दाखल केला होता. आरोपी बोठे याने दाखल केलेल्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाली होती मात्र न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. हा निकाल गुरुवारी न्यायालयाने दिलेला असून त्यात बोठे याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला आहे.

सरकारी पक्षाच्या वतीने मुख्य सरकारी वकील डी आर काळे यांनी काम पाहिले असून आतापर्यंत या प्रकरणात 11 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. घटना घडल्यानंतर सुमारे तीन महिने आरोपी हा फरार झाला होता मात्र त्याला त्यानंतर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपी बोठे याने यापूर्वी जिल्हा न्यायालयात जामीन अर्ज केला होता तो देखील फेटाळण्यात आला होता म्हणून त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामीनासाठी अर्ज दाखल केला मात्र तिथेही त्याच्या पदरी निराशा आलेली आहे.


शेअर करा