नगर ब्रेकिंग. अत्याचार झालेल्या ‘ त्या ‘ अल्पवयीन पीडितेने अखेर बाळाला दिला जन्म

नगर शहरात एक खळबळजनक घटना उघडकीला आली असून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याने गर्भवती राहिलेल्या एका मुलीने बाळाला जन्म दिला आहे. नऊ तारखेला शनिवारी ही घटना उघडकीला आली असून सदर प्रकरणी या आरोपीच्या विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजिद खान साहब खान ( राहणार पंचपीर चावडी अहमदनगर ) असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव असून त्याने नगर शहरात राहत असलेल्या एका 15 वर्षीय मुलीवर वेळोवेळी अत्याचार केला. मागील दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू होता त्यामुळे त्या मुलीला गर्भधारणा झाली आणि तिची नगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रसूती करण्यात आली.

पीडित मुलीने एका मुलीला जन्म दिला असून या घटनेनंतर शहर आणि परिसरात खळबळ उडाली आहे. पीडित मुलीने कोतवाली पोलिस ठाणे गाठून आरोपीच्या विरोधात फिर्याद दिली असून त्याच्याविरोधात पॉक्सो कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलिस नाईक एके दुर्गे हे करत आहेत.