इंधनटॅक्स म्हणून 26. 51 लाख करोड वसुली अन मोदी मित्रांचे ‘ इतके ‘ कर्ज माफ

शेअर करा

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेल आणि गॅसचे दर भरमसाठ वाढलेले आहेत. देशात यामुळे महागाईचा आगडोंब उसळला असून गोदी मीडिया सुस्तपणे पडलेला आहे. रशिया युक्रेन आणि पाकिस्तान याच्यातच नागरिकांना अडकवून मूळ प्रश्न असलेली महागाई हा विषय मीडिया जाणीवपुर्वक टाळत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आकडेवारीसह ही केंद्र सरकारची पोलखोल केलेली असून ट्विटरवर या संदर्भात एक पोस्ट शेअर केलेली आहे.

ट्विटरवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी एक फोटो टाकत पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दराने इंधन टॅक्स असे तब्बल 26. 51 लाख करोड रुपयांची केंद्राने नागरिकांकडून वसुली केली त्यानंतर १०.८६ लाख करोड रुपयांचे मोदी यांच्या मित्रांचे कर्ज रिटन ऑफ केले अशी पोस्ट शेअर केलेली आहे. मोदी मित्र असा उल्लेख राहुल गांधींनी केलेला असून यावर भाजपकडून यावर अद्याप काही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

महागाईने नागरिकांचे जीवन हैराण झालेले असून जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत दुसरीकडे पेट्रोल डिझेल आणि गॅस याच्या किमती देखील पूर्वीच्या सरकारच्या तुलनेत दुपटीवर जाऊन पोहोचलेल्या आहेत. केंद्राकडून मात्र रशिया युक्रेन आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीचे कारणे देत आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न केला जात आहे.


शेअर करा