‘ त्या ‘ निधीतुन ह्या प्रभागातील कामे होणार : महापौर रोहिणी शेंडगे

शेअर करा

नगर शहर आणि उपनगरातील 18 रस्त्यांसाठी शासनाकडून 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला असून त्यामधून प्रभाग क्रमांक चार, 5, 15 आणि 16 येथील रस्त्यांची कामे मार्गी लावण्यात येईल असे महापौर रोहिणी शेंडगे यांनी सांगितले आहे.

रोहिणी शेंडगे म्हणाल्या की, शहर आणि उपनगरातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निधीची मागणी केली आहे. विविध कामांचे प्रकल्प अहवाल तयार करून शासनाकडे सादर केले आणि त्यातून शहर आणि उपनगरातील मुख्य रस्ते कॉंक्रिटीकरण करण्यासाठी मंत्री शिंदे यांच्याकडे पंधरा कोटी रुपयांची मागणी केली होती. आलेल्या या निधीतून मंजूर रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे त्यामुळे शहराचा कायापालट होणार आहे ‘, असेही त्यापुढे म्हणाल्या.


शेअर करा