‘ ह्या ‘ तारखेपर्यंत नगरमध्ये लालपरी सुरळीत होणार

तब्बल साडेपाच महिने चाललेल्या एसटी संपानंतर अखेर न्यायालयाने लक्ष घातल्यावर एसटी कर्मचाऱ्यांना 22 एप्रिल पर्यंत कामावर परतण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. न्यायालयाच्या भूमिकेचा आदर करत नगर विभागातील 400 कर्मचारी कामावर परतले असून 22 एप्रिलपर्यंत एसटी पूर्णपणे सुरळीत सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे शासनात विलनीकरण करण्यासाठी हा संप पुकारण्यात आला होता. महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य केल्या मात्र एसटी कर्मचाऱ्यांना या मागण्या पूर्णपणे मान्य नव्हत्या तर एसटी कर्मचाऱ्यांची शासनात विलीनीकरण करण्यासाठी कर्मचारी ठाम होते.

सदर प्रकरणी अखेर उच्च न्यायालयाने दखल घेऊन कर्मचाऱ्यांना 22 एप्रिल पर्यंत कामावर घेण्यास सांगितले आहे तर ज्यांच्याविरोधात बडतर्फी निलंबन आणि अन्य कारवाया सुरू असतील त्यांना देखील समज देऊन त्यांना कामावर घेऊ मात्र 22 तारखेनंतर जे कर्मचारी कामावर येणार नाहीत त्यांना कामाची गरज नाही असे समजून त्यांची सेवा समाप्त केली जाईल असे परिवहन मंत्री यांनी सांगितलेले आहे. 22 एप्रिलपर्यंत जे कर्मचारी हजर होतील त्यांच्यावर कारवाई होणार नाही मात्र त्यानंतर हजर होण्याची संधी देखील मिळणार नाही, असे सांगण्यात आलेले आहे .