‘ देशात धर्माच्या नावावर राजकारण दुर्दैवी ‘, बाळासाहेब थोरात म्हणाले की ?

शेअर करा

समाजातील अघोरी परंपरांच्या विरोधात सर्वप्रथम भगवान बुद्धांनी आवाज उठवला. अनेक संतांनी देखील समतेच्या परंपरेचा प्रसार केला या तत्त्वांना एकत्र आणण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले मात्र सध्या देशात धर्माच्या नावावर राजकारण होत आहे हे दुर्दैवी आहे, असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथे म्हटलेले आहे.

संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे भीम प्रतिष्ठान तर्फे संविधान स्तंभाचे लोकार्पण आणि विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले की महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर निळवंडे कालव्यासह तालुक्यात विकास कामांचा धडाका सुरु आहे. येथील सुसंस्कृत राजकारण, समाजकारण संपूर्ण राज्याला आदर्शवत आहे.

दुर्गा तांबे, सुनंदा जोर्वेकर, नवनाथ आरगडे, महेंद्र गोडगे, बेबी थोरात, बाळासाहेब गायकवाड,सरपंच श्रीनाथ थोरात, पदमा थोरात यांच्यासह युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निलेश थोरात, गौरव डोंगरे हे देखील यावेळी उपस्थित होते.


शेअर करा