‘ भोंग्यावरून महागाई इंधन दरवाढ का झाली हे जनतेला सांगावे ‘

शेअर करा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंगे आंदोलन सुरू केल्यानंतर त्यांचे पुतणे असलेले आदित्य ठाकरे यांनी यावर भाष्य करताना ‘ भोंगे वाजवायची एवढी हौस असेल तर त्यावरून महागाई इंधन दरवाढ का झाली हे जनतेला सांगावे ‘ असा टोला हाणला आहे.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी मनसेप्रमुख राज ठाकरे आणि भाजपला टोला लगावलेला असून ते म्हणाले की, ‘ भोंगे हा महत्त्वाचा विषय नाही. जर त्यांना इतकी आवड असेल तर त्यावरून महागाई का वाढली इंधन दरवाढ का झाली हे पण जनतेला सांगण्याची हिंमत दाखवावी ‘


शेअर करा