गुड फ्रायडेच्या दिवशी ‘ टिकली ‘ लावण्यावरूनचा वाद पोलिसात, प्रेमविवाहात ठिणगी ?

शेअर करा

महाराष्ट्रात एक वेगळीच घटना औरंगाबाद येथे समोर आलेले असून प्रेमविवाह केलेल्या पती-पत्नीत टिकली लावण्याच्या आग्रहातून भांडण सुरू झाले आणि पत्नीने आत्महत्या करण्यासाठी रेल्वे स्थानक गाठले मात्र तिथे गेल्यानंतर आपल्या दोन मुलींचे दोन वर्षाच्या मुलीचे काय करावे हा प्रश्न तिला पडला आणि तिने 112 नंबरला फोन करत पोलिसांची मदत मागितली. घटनास्थळी तात्काळ दामिनी पथक पोहोचले आणि त्यांनी या महिलेचे मतपरिवर्तन करून त्यांच्यात तिच्यात आणि तिच्या पतीत समेट घडवून आणला.

उपलब्ध माहितीनुसार, औरंगाबाद शहरातील एक युवक हैदराबाद येथे असताना त्याचे तेथील एका दक्षिण भारतीय तरुणीशी सूत जुळले. मुलीच्या कुटुंबीयांनी देखील लग्नाला नकार दिला मात्र मुलाच्या कुटुंबात या लग्नात लग्नाला विरोध होता मात्र तरीही लग्न पार पडले आणि आणि मुलाला घरच्यांनी वेगळे राहायला सांगितले त्याप्रमाणे हे दोघे स्वतंत्र राहत होते.

लग्नानंतर या दांपत्याला एक मुलगी देखील झाली. गुड फ्रायडेच्या निमित्ताने पत्नी चर्चमध्ये जाण्यास निघाली होती त्यावेळी तिच्या पतीने तिला कपाळावर टिकली लावण्याचा आग्रह केला मात्र तिने चर्चमध्ये जाताना टिकली कशी लावू ? तिथून आल्यावर टिकली लावेल असे ती म्हणाली आणि त्यानंतर त्यांच्यात टोकाचे भांडण झाले आणि ती घरातून निघून गेली आणि रेल्वे स्टेशनवर पोहोचली आणि तिने 112 नंबर ला फोन केला.

दामिनी पथकाने तात्काळ तिथे दाखल होत तिला गाडीत बसून रेल्वे स्थानकातून बाहेर आणले आणि आणि तिथेच तिच्या पतीला देखील बोलावून घेतले त्यानंतर दामिनी पथकासमोर त्यांच्यातील मतभेद दूर करण्यात आले आणि इतक्या किरकोळ कारणांवरून एवढे टोकाचे पाऊल उचलणे चुकीचे आहे असे सांगितले त्यानंतर त्यांनी दोघांनीही आमचा एकमेकांवर खूप जीव आहे हे असे सांगत आनंदाने हातात हात धरून ते निघून गेले. सदर घटनेबद्दल दामिनी पथकाचे परिसरात कौतुक करण्यात येत आहे.


शेअर करा