कोरोना काळात तब्बल चाळीस लाख लोकांनी गमावलाय जीव , कोणी केला दावा ?

शेअर करा

देशातील कोरोना साथीच्या विस्फोटाला काँग्रेसने पुन्हा एकदा केंद्र सरकारला जबाबदार ठरवले असून कोरोनाच्या काळात सरकारच्या निष्काळजीपणामुळे मोठ्या प्रमाणात लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. कोरोना मुळे मृत्यू झालेल्या नागरिकांचा आकडा पाच लाख असल्याचे सांगितले जाते मात्र सरकारच्या हलगर्जीपणामुळे 40 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे, असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेला आहे.

कोरोना साथीच्या तीन लाटांनी भारतातील कोट्यवधी नागरिकांना वेठीस धरले होते. सरकारी आकडेवारीनुसार भारतातील धोरणामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या पाच लाख 21 हजार 751 इतकी आहे मात्र न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालाचा दाखला देत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटरवर ‘पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली असून सरकारी आकडे खोटे असल्याचा दावा करताना राहुल गांधी म्हणाले की, ‘ कोरोना काळातील मृतांची संख्या पाच लाख नाही तर ती चाळीस लाख आहे ‘

राहुल गांधी म्हणाले की, ‘ मोदी खरे बोलत नाहीत आणि बोलू देखील देत नाहीत. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणाचाही मृत्यू झाला नाही असेच खोटे ते अजूनही सांगत आहेत. मी याआधी देखील सांगितले होते की सरकारच्या निष्काळजीपणामुळे कोरोना काळात पाच लाख नव्हे तर 40 लाख भारतीयांचा मृत्यू झाला आहे. आता मोदीजींनी आपले कर्तव्य पार पाडावे आणि प्रत्येक कुटुंबाला चार लाख रुपयांची भरपाई द्यावी. महागाई, देशातील जातीय द्वेष आणि कोरोना काळातील मृत्यू अशा अनेक मुद्द्यांवरून राहुल गांधी हे गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारला धारेवर धरत आहेत.


शेअर करा