हिंदू मंदिरासाठी मशिदीतून पाणी , महाराष्ट्रातील एकोप्याचे ‘ असेही ‘ उदाहरण

शेअर करा

राज्यात सध्या भोंग्यावरून राजकारण पेटलेले असताना महाराष्ट्रातील अनेक गावात हिंदू मुस्लिम एकोपा दोन्ही समुदायांनी जपलेला आहे असेच एक गाव म्हणजे मोडनिंब. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील मोडनिंब गाव इथे मशिदीतून हनुमान मंदिरासाठी पाणी दिलं जातं तर मंदिरातील कार्यक्रम मुस्लिम बांधवांच्या नमाज पठणासाठी काही वेळ थांबवले जातात. मुस्लिम बांधवांची प्रार्थना संपली की कार्यक्रम पुन्हा सुरु केले जातात. द्वेषावर आधारित राजकारणाला या गावाने कधीच थारा दिलेला नसून हिंदू मुस्लिम एकतेची अशी अनेक उदाहरणे महाराष्ट्रात आहेत .

मोडनिंब गावात हनुमान मंदिर आणि मस्जिद शेजारीच असून हनुमान मंदिर धुण्यासाठी तसेच स्वच्छतेसाठी मस्जिदीमधून पाणी दिले जातं. मुस्लिम बांधवांनी मस्जिदीच्या बाहेर पाण्यासाठी एक नळ देखील लावलेला असून कित्येक नागरिक देखील या पाण्याचा वापर करतात आणि यावरून कधीच कोणत्याच समाजाने हरकत घेतलेली नाही हा एक आदर्श म्हणावा लागेल.

हनुमान जयंतीदिनी मंदिरात कार्यक्रम सुरु असताना नमाज पठण सुरु होताच काही मिनिटांसाठी हनुमान जयंतीचा कार्यक्रम थांबवला जातो आणि मुस्लिम बांधवदेखील हनुमान मंदिरात धार्मिक कार्यक्रम सुरु होताच पठण बंद काही काळ बंद करतात. मस्जिदीवरील भोंगे काढण्याच्या समोर आलेल्या मनसेच्या भुमिकेमुळे वातावरण तापलं असून मोडनिंबकरांनी हिंदू मुस्लिम एकोपा जपत या राजकारणाला कधीच थारा दिलेला नाही. आम्हाला भोंगा आणि हनुमान चालिसा हा मुद्दा महत्वाचा वाटत नाही तर हा केवळ एक राजकिय स्टंट सुरु असल्याचे मोडनिंबमधील मुस्लिम बांधवांनी सांगितले आहे तर हिंदू बांधवांची देखील अशीच भूमिका आहे.

मुस्लिम बांधव गेल्या अनेक वर्षांपासून पाणी पाईप द्वारे मंदिर स्वच्छतेसाठी देतात आणि.कीर्तन भजन सुरु झाले की नमाज पठण बंद केले जाते.शेकडो वर्षांपासून आम्ही गावात बंधु भावाने राहत असून हिंदू-मुस्लिम समाजाचे आमचे ऋणानुबंध कायम असून आम्ही गावात शांतता आणि हिंदू मुस्लिम एकात्मता कायम ठेवलेली आहे , असेही अनेक रहिवासी अभिमानाने सांगतात.


शेअर करा