नगर ब्रेकींग..एकत्रित ‘ तसला ‘ फोटो डीपीला ठेवून महिलेची केली बदनामी

नगर येथे एक वेगळीच घटना समोर आलेली असून सोशल मीडियावर दोघांचा एकत्रित फोटो ठेवणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. पीडित महिलेची परवानगी न घेता डीपीला दोघांचा एकत्रित फोटो ठेवल्यानंतर विवाहित महिलेची बदनामी झाली आणि त्यानंतर सायबर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, पवन शिंदे राहणार कापूरवाडी तालुका नगर असे अटक केलेल्या इसमाचे नाव असून त्याने त्याच्या मोबाईलवरून महिलेला सुरुवातीला संशयिताने अश्लील मेसेज पाठवले आणि त्यानंतर तिचा आणि स्वतः चा एकत्रित असा फोटो डीपीवर ठेवला यावरून महिलेची बदनामी झाल्यावर तिने पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला.

सायबर पोलिसांनी भादवि कलम 354 नुसार गुन्हा दाखल केलेला असून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आहे. सदर प्रकरणाचा सायबर पोलीस तपास करत असल्याचे समजते ते