..अखेर ‘ त्या ‘ संशयास्पद मृत्यू प्रकरणात पत्नीसह चार जणांवर खुनाचा गुन्हा

शेअर करा

काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात पत्नीला आणण्यासाठी सासरवाडीत गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. 16 एप्रिल रोजी माजलगाव तालुक्यातील वडगाव येथे ही घटना घडली होती. मयत तरुणाचे आई-वडील दोघेही कारागृहात असल्याने तब्बल ७२ तास मृतदेह शवागृहात होता त्यानंतर चौथ्या दिवशी त्याची आई हैदराबाद येथून बीडला आली आणि उत्तरीय तपासणी करण्यात आली त्यानंतर पत्नी सासू सासरा चुलत सासरा यांच्याविरोधात दिंद्रुड ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

काय आहे प्रकरण ?

उमेश दीपक शिंदे ( वय 24 राहणार गेवराई ) याची माजलगाव तालुक्यातील लोणगाव येथे सासुरवाडी असून सहा महिन्यांपूर्वी त्याचा रूपाली या तरुणीसोबत विवाह झाला होता मात्र लग्नानंतर ती नेहमी लोणगाव येथे इथेच राहायची. 16 एप्रिल रोजी सकाळी उमेश याला त्याचा सासरा संतोष उर्फ पिन्या समशेर भोसले याने फोन करून तुझा पत्नीला घ्यायला ये असे सांगितले म्हणून उमेश आणि त्याचा भाऊ कृष्णा हे दुचाकीवरून 16 तारखेला सकाळी साडेअकरा वाजता लोहगाव येथे पोहोचले

तिथे पोहोचल्यानंतर संतोष भोसले याने दुचाकीची चावी काढून घेतली आणि त्यानंतर सासू कविता, पत्नी रूपाली आणि चुलत सासरा सुनील भोसले यांनी दोन्ही भावांना खाली पाडले आणि त्यानंतर कविता आणि रुपाली या मायलेकीने त्याला बळजबरीने विषारी द्रव्य पाजले. कृष्णा यांनी आरडाओरडा केला मात्र त्याला जीवे मारण्याची धमकी देत शांत करण्यात आले. जिल्हा उपरुग्णालयात डॉक्टरांनी उमेश शिंदे याला मयत घोषित केले. उमेशचा भाऊ कृष्णा शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून या चार जणांवर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. उमेश यांच्या हत्येमागे नक्की काय कारण आहे याचा देखील पोलीस शोध घेत आहेत.

मयत उमेश याची आई हैदराबाद येथे कारागृहात असून वडील हे औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात आहेत. ते आल्याशिवाय उत्तरे तपासणी करू देणार नाही आणि तक्रारीचा निर्णयसुद्धा तेच घेतील असा पवित्रा उमेश याचा भाऊ कृष्णा शिंदे यांनी घेतला होता त्यामुळे तब्बल चार दिवस उमेश याचा मृतदेह तसाच होता अखेर आई-वडिलांना पत्रव्यवहार करून उमेश गेल्याची माहिती कळवल्यानंतर उमेश याच्या आईला जामीन मंजूर करण्यात आला आणि वीस तारखेला ती बीडमध्ये पोहोचली त्यानंतर उमेश याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह आईच्या ताब्यात देण्यात आला.


शेअर करा