जेसीबी उभा केला अन एटीएम उखडले , रक्कम मिळेल ही होती आशा मात्र..

शेअर करा

चोरी करण्यासाठी काय शक्कल लढवतील याचा काही नेम राहिलेला नाही अशीच एक घटना सांगली इथे समोर आलेली असून एटीएमची चोरी करण्यासाठी अगोदर जेसीबीची चोरी केली आणि त्यानंतर जेसीबीने 27 लाखांची रोकड असलेले ॲक्सिस बँकेचे एटीएम फोडून ते पळवण्याचा प्रयत्न केला अशी घटना सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील आरग येथे उघडकीला आलेली आहे.

आरग येथे ग्रामपंचायत कार्यालयाजवळ असलेले ॲक्सिस बँकेचे एटीएम आणि त्याच्या जवळच पेट्रोल पंप आहे. पेट्रोल पंपावर उभा केलेला जेसीबी बनावट चावीने सुरू करून दरोडेखोरांनी चोरट्यांनी तिथून पळवला आणि एटीएमच्या समोर उभा केला त्यानंतर ॲक्सिस बँकेचे एटीएम जेसीबीच्या सहाय्याने बाहेर आणून 50 मीटर अंतरापर्यंत नेण्यात आले मात्र तिथे मशीन फोडून रक्कम काढण्याचा प्रयत्न सुरू असतानाच काही व अन्य वाहने आल्याने पोलीस आल्याचा संशय आला आणि त्यांनी तिथून पळ काढला. इतकी सगळी मेहनत करून त्यांना हाती काहीच लागले नाही मात्र पळून जाण्याची वेळ आली.


शेअर करा