जिल्ह्यातून तडीपार तरी नगरमध्येच ‘ पडून ‘ , पोलिसांनी एकास ठोकल्या बेड्या

नगर जिल्ह्यात राहुरीतील एकाला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आल्यानंतर आदेश झुगारून शहरात आलेल्या एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेली आहे. अमोल नारायण होडगर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असल्याचे समजते. 2020 मध्ये अमोल होडगर याला नगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते.

हद्दपार केल्यानंतरही गुन्हेगार जिल्ह्यातच वास्तव्यास असल्याच्या अनेक घटना समोर आल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी तडीपारीची कारवाई करून देखील जे काही गुन्हेगार जिल्ह्यात वास्तव्यास आहेत त्यांना अटक करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने कंबर कसली असून अशा व्यक्तींचा शोध सुरू आहे.

राहुरी तालुक्यात अशा गुन्हेगारांचा शोध घेत असताना अमोल नारायण होडगर हा राहुरी येथील जुने ग्रामपंचायत कार्यालय परिसरात लपून बसला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती त्याआधारे त्या यांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले असून त्याला पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस हेडकॉन्स्टेबल रोहित येमुल, सागर ससाने, मयूर गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.