नगर ब्रेकिंग..गोविंद मोकाटे अखेर पोलिसांच्या ताब्यात , ‘ ह्या ‘ तारखेपर्यंत पोलीस कोठडी

शेअर करा

नगर तालुक्यात खळबळ उडून देणारी एक घटना काही दिवसांपूर्वी उघडकीला आली होती. महिलेवर अत्याचार प्रकरणी फरार असलेले नगरपंचायत समितीचे माजी सदस्य गोविंद मोकाटे यांना तोफखाना पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले आहे.न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, महिलेवर अत्याचार प्रकरणात मोकाटे यांच्याविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात डिसेंबर 2021 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मोकाटे फरार होते. मोकाटे यांच्या पाठीमागे असलेला राजकीय वरदहस्त पाहता ते परिसरातच असून पोलीस कुचकामी भूमिका घेत आहेत असा देखील आरोप पीडित महिलेने केला होता . सदर प्रकरणी तिने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे देखील पाठपुरावा केला होता.

काही कालावधीनंतर तपास ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला मात्र मोकाटे अजित पाटील यांच्या काही हाती लागले नाहीत त्यानंतर पाच महिन्यांपासून मोकाटे हे फरार होते मात्र अखेर तोफखाना पोलिसांनी त्यांना मंगळवारी अटक केली असून न्यायालयाने त्यास 30 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.


शेअर करा