नवरी नटली अन हातात बेडी ठोकली , अखेर ‘ ती ‘ नवरीही धरली…

शेअर करा

काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील तळणेवाडी येथे एका युवकाला बनावट लग्न करून त्याची फसवणूक केल्याप्रकरणी गेवराई पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. सदर प्रकारातील मुख्य सूत्रधार आणि याला शेवगाव तालुक्‍यात बेड्या ठोकल्यानंतर लग्नाला थाटात उभी राहणारी नवरी आणि तिची आई यांना देखील मंगळवारी गेवराई पोलिसांनी औरंगाबाद येथून ताब्यात घेतलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, रेखा बाळू चौधरी आणि तिची आई सुनीता चौधरी ( दोघीही राहणार जाधववाडी सिडको औरंगाबाद ) अशी त्यांची नावे आहेत. तळणेवाडी येथील एका युवकाचे बनावट लग्न लावून त्याला दोन लाख रुपयांना गंडा घालण्यात आलेला होता त्यानंतर नववधू आणि तिचे नातेवाईक अशा पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता . या प्रकारातील मुख्य सूत्रधार असलेला रामकिशन जगन्नाथ तापडिया ( राहणार सालवडगाव तालुका शेवगाव जिल्हा नगर ) आणि नवरी मुलीचा मामा म्हणून मिरवणारा विठ्ठल किशनराव पवार ( राहणार औरंगाबाद ) यांना याआधीच बेड्या ठोकल्या आहेत तर आता नटून-थटून उभी राहणारी नवरी रेखा बाळू चौधरी आणि तिच्या आईला देखील ताब्यात घेण्यात आलेले आहे तर अद्यापपर्यंत एक आरोपी फरार आहे .

काय आहे प्रकरण ?

गेवराई तालुक्यातील तळणेवाडी येथे कृष्णा अशोक फरताळे या तरुणाला रामकिसन जगन्नाथ तापडिया ( राहणार सालवडगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर ) याने औरंगाबाद येथील एका मुलीचे स्थळ आणले होते त्यावेळी नवरी मुलगी रेखा चौधरी आणि इतर चार जणांनी दोन लाख देण्याच्या बदल्यात लग्नाला सहमती दर्शवली आणि त्यानंतर नवरीकडील मंडळींना साठ हजार रुपये रोख आणि एक लाख 40 हजार रुपयांचा डिमांड ड्राफ्ट दिल्यानंतर तालुक्यातील बोरी पिंपळगाव फाट्यावर एका मंगल कार्यालयात वीस जुलै 2021 रोजी लग्न पार पडले होते.

धनादेश वटला आणि त्यानंतर नवरी मुलगी माहेरी जाते म्हणून गेली ती पुन्हा आलीच नाही. काही दिवसात तिचा मोबाईल देखील बंद झाला त्यावेळी या मुलीचा शोध तिच्या सासरकडच्या लोकांनी सुरू केला असता तिचा आठ वर्षांपूर्वी काकासाहेब भाऊसाहेब पठाडे या व्यक्तीशी विवाह झाला आणि त्यांना दोन अपत्ये देखील आहेत अशीही माहिती समोर आली. सदर प्रकाराची माहिती नवरदेवाला समजतात त्याच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्याने लग्न जुळवणारा रामकिसन तापडिया याच्याशी संपर्क साधला त्यावेळी त्याने ‘ तुम्हाला काय करायचे ते करा कुठे फिर्याद यायची ती द्या ‘ असे म्हणत फोन कट केला.

कृष्णा फरताळे यांनी संतोष विश्वनाथ शिंदे, सुनिता बाळू चौधरी, रेखा बाळू चौधरी ( तिघेही राहणार जाधव वाडी औरंगाबाद सिडको ) आणि रामकिसन तापडिया ( राहणार सालवडगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर) आणि किसन पवार ( राहणार सावरखेडा औरंगाबाद गंगापूर ) या पाच जणांच्या विरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आणि एकोणीस तारखेला मुख्य सूत्रधार असलेला रामकिसन जगन्नाथ तापडिया याला मंगळवारी रात्री शेवगाव येथून बेड्या ठोकल्या होत्या.


शेअर करा