‘आजम फक्त माझा आहे ‘ म्हणत प्रेयसीने मारली उडी पण झालं असं की ?

शेअर करा

देशात अनेक खळबळजनक घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना उत्तर प्रदेश इथे उघडकीस आली असून बरेलीमध्ये प्रियकर-प्रेयसीने घरातील लोकांवर नाराज होऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. प्रेयसीच्या घरातील लोकांनी प्रियकराला धावत जाऊन पकडलं पण प्रेयसीने ‘आजम फक्त माझा आहे’ असं म्हणत खाली उडी मारली अन कंबरडं मोडून घेतलं. तिला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे तर तरूणीच्या कुटुंबियांनी तिच्या प्रियकराला पोलिसांच्या हवाली केलं.

उपलब्ध माहितीनुसार, बारादरी भागात राहणारी एक तरूणी गेल्या पाच वर्षांपासून शेजारी राहणाऱ्या तरूणाच्या प्रेमात पडली होती मात्र सुरूवातीपासूनच दोघांच्याही नात्याला कुटुंबियांचं समर्थन नव्हतं पण तरीही कुणाची पर्वा न करता दोघांचं प्रेम आणखी वाढत गेलं आणि यावरून त्यांच्या घरच्यांमध्ये वाद देखील झाले. जिद्दीला पेटलेल्या प्रेयसी आणि प्रियकराचं नातं मोठ्या विरोधानंतर काही कारणाने हे नातं घरातील लोकांनी तोडलं.

दोघांनी एकमेकांना भेटणं काही कालावधीतच पुन्हा सुरु केलं. दोघांना एकमेकांसोबत लग्न करायचं होतं मात्र घरातील लोक या लग्नासाठी तयार होत नव्हते म्हणून अखेर दोघांनी आत्महत्येचा निर्णय घेतला आणि ते आत्महत्या करण्यासाठी दोन मजली छतावर चढले मात्र त्यांच्यावर सतत लक्ष ठेवणाऱ्या प्रेयसीच्या कुटुंबियांना याची माहिती मिळाली आणि ते घटनास्थळी पोहोचले.

कुटुंबियांना येताना बघून तरूणी जोरात ओरडली आणि म्हणाली ‘आजम केवळ माझा आहे’ आणि त्यानंतर तिने छतावरून खाली उडी मारली. जसा प्रियकर उडी मारणार त्याला तरूणीच्या कुटुंबियांनी पकडलं अन त्याला पोलिसांच्या हवाली केलं. उडी मारलेल्या तरूणीवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून तरूणीच्या कंबरेत फ्रॅक्चर आहे आणि आता ती कधीच योग्यप्रकारे चालू शकणार नाही.


शेअर करा